लॉकडाऊननंतर स्थिरस्थावर व्हायला 9 ते 12 महिने लागतील, नवा अहवाल आला समोर

लॉकडाऊननंतर स्थिरस्थावर व्हायला 9 ते 12 महिने लागतील, नवा अहवाल आला समोर

लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्थेची चाकं थांबली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मे: कोरोनामुळे देशासह राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्थेची चाकं थांबली आहे. लॉकडाऊनचा फटका सर्वत्र क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. बांधकाम व्यावसायिकांही याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊननंतर स्थिरस्थावर व्हायला किमान 9 ते 12 महिने लागतील, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या (क्रेडाई-एमसीएचआय) नव्या अहवालात म्हटलं आहे.

हेही वाचा.. मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? काय म्हणाले गृहमंत्री

क्रेडाई-एमसीआयने प्रश्नावलीच्या माध्यमातून 500 सदस्यांच्या माहितीच्या आधाराने अहवाल प्रकाशित केला आहे. या संशोधन अहवालात असे दिसून आले आहे की, 60 टक्के विकासक मानतात की, लॉकडाऊननंतर 9 -12 महिन्यांत रिअल इस्टेटचा व्यवसाय सामान्य होताना दिसेल तर केवळ 30 टक्के विकासकांच्या मते 6 महिन्यांत व्यवसाय सामान्य होईल.

क्रेडाई-एमसीआयआयने त्यांच्या सदस्यांनी यात सहभाग घेतला. नोटाबंदी, रेरा, जीएसटी अशा अनेक संकटांना रिअल इस्टेट तोंड देत असताना कोविड-19 ने डोके वर काढले आणि व्यवसायाबरोबर व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले. पण तरीही 83 टक्के व्यावसायिक आपला व्यवसाय न बदलता बांधकामात राहू इच्छितात असं या अहवालावरून समोर आलं आहे. बांधकाम व्यावसायिक गेल्या 3 वर्षांपासून अनेक अडचणींना तोंड देत असूनही या अहवालानुसार 83 टक्के व्यावसायिक अजूनही आपल्या व्यवसायावर कायम असल्याचं क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शाह यांनी माहिती दिली.

नयन शाह म्हणाले, रिअल इस्टेट उद्योग भारतातील इतर उद्योगांप्रमाणेच स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहे, त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल मानला पाहिजे. या सर्वेक्षणानुसार सध्याच्या कठीण परिस्थितीतही 83 टक्के विकासकांनी आपल्या उद्योगाशी दृढता आणि आत्मविश्वास दाखवून याच व्यवसायात कायम राहत पुढे जाणे पसंत केले आहे. तर योग्य किंमत मिळाल्यास, जवळजवळ 50 टक्के विकसकांनी नवीन मालमत्ता संपादित करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच 2021 सालापर्यंत निवासी क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्याची इच्छाही दर्शवली आहे. भविष्यातील प्रकल्पांमध्ये WHF विचारात घेऊन डिझाइनमध्ये बदल घडवणे बंधनकारक असेल, पण काही विकासक सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांतून प्रयत्न करण्यासाठी उत्सुक आहेत.

साईटवरील कामगार आणि कुशल कारागिरांची कमतरता असूनही बरेच विकासक आपला प्रकल्प कसा पूर्ण होईल. याकडे लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. या सर्व्हेमध्ये विशेष गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे 95 टक्के विकासक Essential commodities sector किंवा करमणूक सारख्या क्षेत्रामध्येही आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

एक मनोरंजक शोध म्हणजे सुमारे 100 टक्के विकासक आवश्यक वस्तू क्षेत्रात किंवा करमणूक इत्यादी क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढविण्याकडे पहात आहेत. धोरणात्मक विकासक प्रकल्पांसाठी एकमेकांना एकत्रित करण्याचा आणि भागीदारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि पुरवठादार आणि विक्रेते शोधत आहेत कोण त्यांच्याशी करार बदलू शकेल. या संशोधन अहवालात अनेक आर्थिक, सरकारशी संबंधित, कामगारांशी संबंधित, प्रकल्प पूर्ण करणे आणि ग्राहकांशी संबंधित रणनीती नमूद केल्या आहेत. काही विकासक एक धोरणात्मक पवित्रा घेत एकमेकांच्या सहकार्याने आणि भागिदारी करत प्रकल्प करतांना दिसत आहेत. तसेच ते बार्टर एग्रिमेंट करू शकतील असे सप्लायर्स आणि व्हेंडर्सना प्राधान्य देत आहेत. या संशोधन अहवालात अनेक आर्थिक, सरकारशी संबंधित, कामगारांशी निगडीत, प्रकल्प पूर्ण करण्याबाबतचे आणि ग्राहकांशी संबंधित रणनीती नमूद करण्यात आल्या आहेत.

काय आहे क्रेडाई-एमसीएचआय?

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीची (क्रेडाइ-एमसीएचआय) स्थापना 1982 साली झाली. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील ही प्रमुख आणि मान्यताप्राप्त संघटना आहे. बांधकाम विकास क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना क्रेडाइ-एमसीएचआय एका व्यासपीठावर आणून या उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करते.

हेही वाचा...नगरसेविका पुत्रासह 12 प्रतिष्ठीतांना रंगेहात पकडलं, करत होते बेकायदा कृत्य

मुंबईतील 1800 अग्रगण्य विकासकांच्या सदस्यत्वासह क्रेडाई-एमसीएचआयने मुंबई महानगर क्षेत्रातही विस्तार केला असून, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-विरार शहर, रायगड आणि नवी मुंबई येथे संघटनेची कार्यालये आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील निवासी व व्यापारी मालमत्तांच्या संघटित विकासकामांपैकी 80 टक्के कामांचे विकासक क्रेडाइ-एमसीएचआयचे सदस्य आहेत.

First published: May 28, 2020, 11:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading