Home /News /maharashtra /

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत घेतला मोठा निर्णय

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत घेतला मोठा निर्णय

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

    मुंबई, 24 फेब्रुवारी : सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 250 पर्यंत सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यााच निर्णय घेण्यात आला आहे.  यामध्ये 250 पर्यंत सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मात्र खुला असेल. सहकार विभागाने 31 मार्चपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यातून 250 पर्यंत सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांना यातून वगळण्यात आलं आहे. हे ही वाचा-सिनेमात शोभेल अशी घटना; 22 वर्षांपूर्वीच्या गँगरेपचा आरोपी अखेर अटकेत 10 फेब्रुवारी रोजी 250 हून कमी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत सरकारने नियमावली प्रसिद्ध केली होती. यानुसार सहकार खात्याच्या अधिकाऱ्याऐवजी गृहनिर्माण संस्थेतील निवडणूक लढविण्यास इच्छुक नसलेल्या सभासदाला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमण्याचा महत्त्वाचा बदल सहकार विभागाने केला होता. यापूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही या निवडणुकीत अनेक अडथळे आले आहे. दरम्यान 250 पर्यंत व त्याहून कमी सदस्यसंख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांना निवडणूक घेता येणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या