'या' ९ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचे कारण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल!

'या' ९ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचे कारण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल!

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात डेंग्यूने थैमान घातलं आहे. तसंच जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे बळीचा आकडा ३० वर पोहोचला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 27 आॅक्टोबर : नाशिक जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसात शहरात पाचशेहुन अधिक जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आज डेंग्यूमुळे एका नऊ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

जुने नाशिक भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. अशरफ शेख असं या नऊ महिन्याच्या बाळाचं नाव आहे.  अशरफला डेंग्यूची लागण झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान अशरफची प्राणज्योत मालवली. नऊ महिने जग पाहिलेल्या  या बाळाच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात डेंग्यूने थैमान घातलं आहे. तसंच जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे बळीचा आकडा ३० वर पोहोचला आहे.  काही दिवसांपूर्वीच एकाच दिवसात उपचार घेत असणाऱ्या तिघांचा मृत्यू  झाला होता. यातील एक भाजपच्या येवला नगराध्यक्षांचा भाऊ होता.

नाशिकचं जिल्हा सामान्य रुग्णालयात जनरल तपासणी कक्षात गेल्या महिन्याभरापासून रुग्णांची गर्दी ही वाढतंच चालली आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे तापाचे रुग्ण आहे. यातील 216 रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

दररोज 1 रुग्ण मृत्युमुखी

मात्र या स्वाईन फ्ल्यू वॉर्डमधील परिस्थिती तर अधिकच चिंताजनक झाली आहे.या वॉर्डमध्ये सध्या 14 रुग्णांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असला तरी दररोज 1 रुग्ण मृत्युमुखी पडतोय. दूषित पाणी,अंगावर ताप काढणं,रोग प्रतिकारशक्ती कमी होणं अशी अनेक कारणं आरोग्य यंत्रणा देत असल्या तरी स्वाईन फ्ल्यूची दहशत कमी करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यात नाशिक शहराची परिस्थिती पाहून लोकप्रतिनिधीनी विशेष महासभा बोलावली होती.  या महासभेत लोकप्रतिनिधींचा रोष आणि प्रशासकीय कामकाजाला कंटाळलेल्या महापौर रंजना भानसी यांचा रुद्रावतार  महासभेत पाहायला मिळाला. महासभेचे आदेश पाळले जाणार नसेल आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जाणार नसेल तर या पुढची महासभाच होऊ देणार नाही असा सज्जड दमच महापौर रंजना भानसी यांनी तुकाराम मुंढे यांना भरला होता.

=============

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2018 06:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading