03 मे : मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेली एक ७० वर्षीय महिला पाय घसरून विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडली आहे.
जामनेर, बोदवड, पारोळा यांसारख्या काही भागात पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. अशाच स्थितीत जामनेर तालुकयातील शेंगोळा या गावातील नर्मदा आनंदा आढाव या वृद्ध महिला गावातील इतर महिलांसोबत सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या असता पाय घसरून त्या विहिरीत पडल्या.
विहिरीत पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडताच गावातील ग्रामस्थांनी विहिरीवर गर्दी केली. मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबात कोणीही नसुन त्या एकट्याच राहत असल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.