• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • घरासमोरून गायब झाली 6 वर्षांची मुलगी, दुसऱ्या दिवशी थेट खाडीत आढळला मृतदेह

घरासमोरून गायब झाली 6 वर्षांची मुलगी, दुसऱ्या दिवशी थेट खाडीत आढळला मृतदेह

दापोली तालुक्यातील (Dapoli Taluka) 6 वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती.

  • Share this:
दापोली,14 मार्च : दापोली तालुक्यातील (Dapoli Taluka) भोपण येथील मुस्लीम मुहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले (वय 6 वर्ष) ही मुलगी शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी अखेर तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी दुपारच्या सुमारास भोपण मुस्लीम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवत होते. सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला आणि त्यावेळी नसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही. म्हणून घरातल्या पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र आजपर्यंत कोठेही नुसेबा आढळून आली नाही. हेही वाचा - तरुणासोबत धक्कादायक प्रकार, पैसे देऊन लग्न जमवलं आणि लग्नानंतर बायकोने केली अजब मागणी नुसेबा हरवल्याची तक्रार पोलीस स्थानक दाभोळ येथे नोंदविण्यात आल्याची माहिती भोपणचे पोलीस पाटील संजय खळे यांनी दिली. पोलीस तपास सुरू असतानाच तिचा मृतदेह खाडीत आढळून आला आहे. नुसेबाचा मृत्यू कसा झाला? ती खाडीत कशी गेली? तिचा घातपात करण्यात आला की नैसर्गिक मृत्यू झाला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नुसेबाचा मृत्यू नेमका कसा झाला हे पोलीस तपासातून समोर येणार आहे. मात्र जरतिचा घातपात झाला असेल तर हा घातपात कोणी केला याचा शोध लागणे गरजेचे आहे.
Published by:Akshay Shitole
First published: