अकोला,04 एप्रिल :अकोल्यातील (Akola) मूर्तिजापूर येथील रेल्वे स्टेशनवर (Murtijapur Railway Station) एका 50 वर्षीय इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने या इसमाचा जीव थोडक्यात वाचला. पण, यात त्याला पाय गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर येथील रेल्वे स्टेशनवर ही घटना 4 एप्रिलला सकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान समोर आली. राजू नामदेव घोगरे असं 50 वर्षाच्या इसमाचं नाव आहे. राजू घोगरे हे खापरवाड़ा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
आज सकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान बडनेराकडे जात असलेल्या भरधाव रेल्वे समोर उडी घेऊन राजू नामदेव घोगरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा उजवा पाय तुटून पडला नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला, पण पाय तुटल्याने कायमच दिव्यांगत्व आलं.
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत अभिनेते, निर्मात्यांशी साधला संवाद; नेमकं काय घडलं?
या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत राजू घोगरे यांना तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. पोलिसांचा तपास होईल.
परंतु, रागाच्याभरात केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नात आलेलं दिव्यांगत्व आयुष्यभरासाठी मनावर घाव करून गेला. अनेकवेळा घरगुती कारणावरून किंवा शुल्लक कारणावरून अश्या घटना घडत असतात. अडचणी आणि कठीण प्रसंगाच पर्याय आत्महत्या कधीच नसते, कठीण प्रसंगात शांत राहणं हा त्यावरील उपाय आहे.
ऑनलाइन गेमच्या वादात सहावीच्या मुलाची हत्या; रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
वयाच्या 50 व्या वर्षी राजू घोगरे यांच्यावर आलेलं दिव्यांगत्व त्यांच्यासह त्यांच्या परिवरलाही दुःख देणार ठरलं आहे. राजू सारखे अनेक जण आहेत, जे हिम्मत हारून अश्या प्रकारचं टोकाचं पाऊल उचलतात. आणि स्वतःसह परिवाराला दुःखात ढकलतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News