मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वेद शिकवणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत केले अनैसर्गिक कृत्य

वेद शिकवणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत केले अनैसर्गिक कृत्य

पीडित 12 वर्षी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्याच्यासोबत इतर सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पीडित 12 वर्षी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्याच्यासोबत इतर सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पीडित 12 वर्षीय विद्यार्थी शिक्षण घेत असून त्याच्यासोबत इतर सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

  • Published by:  sachin Salve
किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 25 डिसेंबर : शिक्षकी (teacher) पेशाला काळीमा फासणारी घटना वाशिम (washim) जिल्ह्याच्या कारंजा शहरात घडली आहे. एका वेद पाठशाळेत वेदपठणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंजा शहरात ही घटना उघडकीस आली आहे. अजय भगवानराव पाठक ( वय 45) असं या नराधमाचं नाव आहे.  पीडित 12 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाची तक्रार केली असून गुन्हा दाखल करून या नराधमाला अटक करण्यात आली आहे. नातीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या आजोबांचा खून, गावगुंडांकडून बेदम मारहाण पीडित 12 वर्षी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्याच्यासोबत इतर सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना वेदपाठ शिकवण्याकरीता औंढा नागनाथ या गावातील अजय भगवानराव पाठक हे वेद शिक्षक असून ते या विद्यार्थ्यांसोबत वेद शाळेमध्ये राहत होते. वेद शिक्षक अजय भगवानराव पाठक याने पीडित विद्यार्थ्यांला हातपाय दाबायला बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्ती करून अनैसर्गिक कृत्य केले.  त्यानंतर सदर प्रकार विद्यार्थ्यानं त्याच्या वडिलांना सांगितला. त्यामुळे त्यांना एकच धक्का बसला. जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून कोर्टातच जबरी चोरी, म्हणे शिक्षेचा घेतला बदला! त्याच्या वडिलाने पीडित 12 वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन कारंजा पोलीस गाठले. पीडित मुलाचा जबाब नोंदवण्यात आला त्यानंतर आरोपी शिक्षकांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे कारंजा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
First published:

Tags: Rape

पुढील बातम्या