प्रशांत बाग प्रतिनिधी,
नाशिक, 02 जानेवारी : नाशिकमध्ये पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलगा गमावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरातील बालकनीतून पडल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा लहानगा जेव्हा बालकनीत खेळत होता तेव्हा मुलाचे आई-वडिल काय करत होते असा प्रश्न आता विचारला जात आहे.
नाशिकच्या अंबड़ परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंशुमन अजय शर्मा असं मृत झालेल्या 3 वर्षीय मुलाचं नाव आहे. अंशुमन घरातील बालकनीमध्ये खेळत होता. खेळता-खेळता तो बालकनीतून खाली डोकावून पाहत होता. आणि त्यातच तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
आपला मुलगा बालकनीत खेळत आहे. तो डोकावतो आहे अशा वेळी पालकांचं लक्ष कुठे होतो असा असा संतप्त सवाल आता शर्मा यांच्या इतर कुटुंबीयांकडून विचारला जात आहे. शर्मा यांचं कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहतं.
अंशुमनच्या अशा मृत्यूमुळे संपूर्ण शर्मा कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला तर संपूर्ण परिसरातून यावर शोक व्यक्त होत आहे. पण आता डोक धरून बसण्याला काही अर्थ नाही. पालकांचं मुलांवर होणार दुर्लक्ष याचाच हा फटका असल्याचं आता बोललं जात आहे.
दरम्यान, अंशुमनचा अपघात होताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याला पोलिसांनी मृत घोषित केलं. पालकांच्या अशा हलगर्जीपणामुळे अंशुमनचा असा नाहक बळी गेल्याच्या चर्चा सध्या परिसरात आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल ही बाब मान्य आहे. पण त्यातूनही मुलांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष असणं. महत्त्वाचं आहे. नाहीतर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते.
VIDEO: 'हेल्मेट घालून जिवंत राहणार असं कुठे लिहलंय', पुणेकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया