मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संगमनेर हादरलं, 23 वर्षीय तरुणाने 4 वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार!

संगमनेर हादरलं, 23 वर्षीय तरुणाने 4 वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार!

अत्याचार करणारा मामा हा पीडित कुटुंबीयांच्या शेजारी राहतो. तो पीडित चिमुरडीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता.

अत्याचार करणारा मामा हा पीडित कुटुंबीयांच्या शेजारी राहतो. तो पीडित चिमुरडीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता.

पीडित चिमुरडीच्या घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेल 23 वर्षीय तरुणाने हे कृत्य केले आहे.

संगमनेर, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराची (rape) घटना उघडकीस आहे.संगमनेर (Sangamner ) शहरातील मध्यवस्तीत घडली घटना असून शेजारीच राहणाऱ्या 23 वर्षीय आरोपीने हे कृत्य केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील मध्यवस्तीत भागात ही घटना घडली आहे. पीडित चिमुरडीच्या घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेल 23 वर्षीय तरुणाने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी या नराशम रोशनला ताब्यात घेतले आहे.

Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव

आज संध्याकाळी घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेल याने पीडित चिमुरडीसोबत सोबत कृत्य केले. चिमुरडी रडत घरी गेल्यानंतर घरच्यांनी विचारणा केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी रोशन ददेलला ताब्यात घेतलं. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमनेर पोलीस करत आहे.

घरात घुसून विवाहित तरुणीची हत्या

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील चवडेश्वरी मंदिर परिसरात आपल्या आईसोबत राहणाऱ्या विवाहित तरुणीची प्रियकराने घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर प्रियकर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभीड येथील चवडेश्वरी मंदिर परिसरात ही घटना घडली. पूजा रवींद्र सलामे (28) असं मृत महिलेचं नाव आहे.  पूजा सलामे या तरुणीचे लग्न चिखल परसोडी येथील बागडे नामक युवकाशी झालं होतं. मात्र त्याच्याशी मतभेद झाल्याने युवती ही आपल्या आईकडे नागभीडला राहत होती. दरम्यान तिचे संबंध परसोडी येथीलच विवेक ब्रम्हदास चौधरी (25) याच्याशी जुळले होते.

सेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसबाहेरचा पहिला VIDEO, कारमध्ये आढळले फटाके

एक महिन्यापूर्वी काही कारणावरून भांडण झाल्याचे समजते. आज विवेक ब्रम्हदास चौधरी (25) हा सकाळी पूजा ला भेटायला आला, यावेळी पूजा बाहेर गेली होती. आरोपीने पूजाच्या गळ्यावर सपासप धारधार शस्त्राने वार केल्याने पूजाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशन मध्ये आत्मसमर्पण केले. पोलीसांनी घटनास्थळी पोचत पंचनामा करून प्रेत ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे रवाना केली. घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस करत आहेत.

First published: