नाशिक, 18 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नाशिकच्या रोकडोबा वाडीत आईला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यावर मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी समाज कल्याण कार्यालयात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रोकडोबा परिसरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुण्याच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या अधिकाऱ्याने दिले धडे, अजितदादांनी दिले आदेश
आपल्या आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांचा 23 वर्षीय मुलाला आईला कोरोनाची लागण झाली हे सहन झाले नाही. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
यांच्या नावातच दडलंय खूप काही; म्हणून या सेलिब्रिटींच्या मुलांची विचित्र नावं
मुलाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.