सातारा, 09 जून: राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरल्यामुळे दिलासा आहे पण मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही कायम आहे. साताऱ्यातील (Satara) फलटणमध्ये एका 20 वर्षीय तरुणाला जिवंतपणीच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेसी ही अशी सत्यघटना फलटण शहरातील मंगळवार पेठेत घडली आहे. कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण पणे बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन प्रशासनाकडून आल्याने संबधित युवकाचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. सिद्धांत मिलिंद भोसले (वय 20) असे या युवकाचे नाव आहे.
चमत्कार! बर्फाखाली दबलेला हा प्राणी 24 हजार वर्षांनंतरही सापडला जिवंत
मागील मे महिन्यात या युवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतर युवकाने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले होते. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत बरा झाला असताना दोन दिवसांपूर्वी 7 जूनला कोरोनाने मृत्यू झालेल्या यादीत संबधित युवकाचे नाव आल्यामुळे आरोग्यविभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जडेजाने पत्नीसोबत केलं अभिमानास्पद काम, तुम्हीही सलाम कराल!
धक्कादायक बाब म्हणजे, सिध्दांत भोसले या युवकाच्या आईला तुमचा मुलगा मयत झाला असल्याचा फोन प्रशासनाकडून आल्यामुळे फलटण येथील आरोग्य यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Satara