Home /News /maharashtra /

दिवाळीच्या तोंडावर चंद्रपुरात धक्कादायक घटना, 17 वर्षांच्या उमेशला ट्रॅक्टरने चिरडले

दिवाळीच्या तोंडावर चंद्रपुरात धक्कादायक घटना, 17 वर्षांच्या उमेशला ट्रॅक्टरने चिरडले

गावाच्या रस्त्यावरून जात असताना अचानक एक वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने उमेशला धडक दिली. धडक बसल्यानंतर उमेश जागीच कोसळला आणि...

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 12 नोव्हेंबर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी (Sand smuggling) करणाऱ्या ट्रॅक्टरने बकरी चरण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय युवकाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. राजुरा तालुक्यातील विहीरगाव इथं ही घटना घडली आहे. मृतकाचे नाव उमेश सोनुरले (वय 17) असे आहे. उमेश  नेहमी प्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी घेऊन निघाला होता. गावाच्या रस्त्यावरून जात असताना अचानक एक वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने उमेशला धडक दिली. धडक बसल्यानंतर उमेश जागीच कोसळला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडला. त्यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रॅक्टर गावातील नाल्यातून अवैध वाळूचा उपसा करून चालला होता. दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पतीची... उमेशचा मृत्यू झाल्यामुळे ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. उमेशच्या मृत्यूची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी एकच गर्दी झाली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर उमेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. 5 IPL जिंकणाऱ्या रोहितलाच दिग्गज क्रिकेटपटूनं आपल्या IPL संघातून वगळलं! ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर उमेशचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.सध्या गावात महसूल आणि पोलीस प्रशासनाचे पथक पोहोचले असून गावातून वाहतूक होणाऱ्या अवैध वाळू ट्रॅक्टरबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Chandrapur, चंद्रपूर

पुढील बातम्या