पुरासोबत सेल्फी काढण्यासाठी वाकला, पाय घसरल्याने मित्राचा हात सुटला आणि...

पुरासोबत सेल्फी काढण्यासाठी वाकला, पाय घसरल्याने मित्राचा हात सुटला आणि...

हेमंत राजेश जागींड (वय 15) असं वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे. तो त्याच्या मित्रासोबत नदीकाठी पाणी पाहण्यासाठी गेला होता.

  • Share this:

अमोल गावंडे,(प्रतिनिधी)

बुलढाणा, 28 सप्टेंबर : बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात एक अल्पवयीन मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुटाळा खुर्द इथल्या बोर्ड नदीमध्ये 15 वर्षीय मुलगा पुरामध्ये वाहून गेला आहे. सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो वाहून गेल्याची माहिती त्याच्या सोबत असलेल्या मित्राकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांत नद्याला पूर आला आहे. अशा वेळी पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये असा इशारा देण्यात आला असतानी मुलं पाण्याजवळ सेल्फी काढण्यासाठी गेले असता हा अपघाता झाला आहे.

हेमंत राजेश जागींड (वय 15) असं वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे. तो त्याच्या मित्रासोबत नदीकाठी पाणी पाहण्यासाठी गेला होता. पाण्यासोबत सेल्फी काढताना त्याचा पाय घसरला आणि पूर आलेल्या नदीमध्ये तो पडला. पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे तो नेमका कुठे वाहून गेला याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेमंतच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार पोलीस आता सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत तर हेमंतचा शोध घेत आहेत. दरम्यान, हेमंत अशा प्रकारे वाहून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस हेमंतला शोधण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी पंढरपूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्लास्टिकच्या कागदावरून मुलाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाल्याचं समोर आलं आहे.

प्लास्टिक कागदावरून पाय घसरून आईच्या डोळ्यांदेखतच शेततळ्यात मुलगा बुडाल्याची धक्कादायक समोर आली आहे. अभिजीत रामचंद्र आगवणे (वय-17) असे मृत मुलाचे नाव आहे. अभिजीतसोबत एका कामगाराचाही बुडून मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील काळाखोरा या भागात रामचंद्र आगवणे यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली आहे.

इतर बातम्या - आता शत्रूची खैर नाही! भारतीय नौदलाच्या सेवेत पाणबुडी 'INS खांदेरी' दाखल

मिळालेली माहिती अशी की, तळ्यातील पाणी कमी झाल्यामुळे कागद लिकिज काढण्यासाठी रामचंद्र आगवणे यांचा मुलगा अभिजीत रामचंद्र आगवणे आणि राजस्थानमधील कामगार सुरेंद्रसिंह (वय 25) हे दोघे शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोरीच्या साह्याने शेततळ्यात उतरले होते. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे प्लास्टिक कागदावरून सुरेंद्रसिंह याचा पाय घसरला आणि तो तळ्यामध्ये पडला शेजारीच उभा असलेल्या अभिजीतने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही पाण्यामध्ये पडले. हे सर्व दृश्य अभिजीतच्या आईच्या डोळ्यासमोर घडत होते. 'आई मला वाचव.. आई मला वाचव..' अशी आर्त हाक अभिजीत मारत होता. पण आई हतबल झाली, अखेर आईने स्वतःचा पदर अभिजीतच्या दिशेने फेकला. परंतु दोघेही तोपर्यंत बुडाले होते. हे वृत्त वाऱ्यासारखे खर्डी गावात पसरले. नागरिकांनी तळ्याकडे धाव घेतली. पाणी गढूळ झाल्यामुळे दोघांचा शोध घेणे अवघड झाले होते. अखेर बोरीच्या फांद्यां तळ्यात फिरवल्या अखेर सायंकाळी सातच्या सुमारास दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

इतर बातम्या - राजेंना मी गाडी-बंगला द्यायला तयार पण...; पवारांचा उदयनराजेंना टोला!

आईचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. अभिजीतच्या जाण्याने तो शिक्षण घेत असलेल्या सीताराम महाराज विद्यालयाने शाळा बंद ठेवली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खर्डी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

CCTV VIDEO: मोबाईलच्या दुकानावर चोरांचा डल्ला, 17 लाखांचा मुद्देमाल लंपास

Published by: Renuka Dhaybar
First published: September 28, 2019, 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading