बीड, 24 मे : बंधाऱ्याच्या चारीसाठी खोदलेल्या खड्यात पडून शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू दुर्दैवी झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या (beed) माजलगाव शहराजवळ घडली आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई केलेली अशी नातेवाईक यांनी मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव शहराजवळील केसापुरी कॅम्पमध्ये ही घटना घडली. शेख सद्दाम (15) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील लोणी सावंगी तेथे साडेतीनशे कोटी खर्च करून बंधाऱ्यातून गोदावरी नदीला पावसाळ्यात येणारे पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या चारी कालवा खोदण्यात येत आहे.
केसापुरी कॅम्प वसाहत येथे महिन्याभरापूर्वी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. यात लिकेज झालेल्या पाइपलाईनचे पाणी जमा झाल्याने हा भरला आहे. सोमवारी शेख सद्दाम शेख बिलाल ( 16) व त्याचा छोटा भाऊ मुजाहेद ( 12) व 13 वर्षांचा मुलगा असे तिघे खड्डयाजवळ खोदून फेकलेल्या मुरुमावरून जात होते. यावेळी शेख सद्दाम याचा पाय मुरुमावरून घसरल्याने तो खड्डयात जाऊन पडला. खड्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले होते, त्यामुळे सद्दाम पाण्यात बुडाला होता.
('बोगस बियांणाचा पुरवठा करणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाका')
मुलांनी आरडाओरड केल्याने लोक मदतीसाठी धावून आले. त्यानंतर लोकांनी खड्डयात उतरून बुडालेल्या सद्दामला बाहेर काढले. परंतु त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. सद्दामच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई केलेली अशी नातेवाईक यांनी मागणी केली. तर याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.