• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • क्रिकेट खेळताना 15 वर्षीय मुलाचा चक्कर येऊन मैदानावर मृत्यू, घटनेचा VIDEO

क्रिकेट खेळताना 15 वर्षीय मुलाचा चक्कर येऊन मैदानावर मृत्यू, घटनेचा VIDEO

रविवारची सुट्टी असल्यामुळे श्रेयस हा आपल्या मित्रांसोबत दुपारी उंटवाडीतील रणभूमी मैदानावर क्रिकेट खेळत होता.

रविवारची सुट्टी असल्यामुळे श्रेयस हा आपल्या मित्रांसोबत दुपारी उंटवाडीतील रणभूमी मैदानावर क्रिकेट खेळत होता.

रविवारची सुट्टी असल्यामुळे श्रेयस हा आपल्या मित्रांसोबत दुपारी उंटवाडीतील रणभूमी मैदानावर क्रिकेट खेळत होता.

  • Share this:
नाशिक, 11 ऑक्टोबर : क्रिकेट (cricket ) खेळत असताना एका 15 वर्षांच्या मुलाला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला, काही कळायच्या आता त्याचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये (nashik) ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाता आहे. नाशिकमधील सिडको भागात ही घटना घडली. श्रेयस सुधीर ढोरे (shreyash dhore) (रा. कालिका पार्क, अण्णा पाटील शाळेमागे, सिडको) असे मृत मुलाचे नाव असून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. रविवारची सुट्टी असल्यामुळे श्रेयस हा आपल्या मित्रांसोबत दुपारी उंटवाडीतील रणभूमी मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना अचानक श्रेयसला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. श्रेयसच्या मित्रांनी त्याला तातडीने मैदानातून बाहेर नेलं. त्यानंतर त्याला तातडीने  उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 15 वर्षीय श्रेयसचा क्रिकेट खेळता खेळता अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रेयसच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रेयस जेव्हा बेशुद्ध झाला होता त्यानंतर त्याचे मित्र त्याला उचलून मैदानातून बाहेर नेत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केला तरुणावर जीवघेणा हल्ला, अंबरनाथमधील घटना याप्रकरणी पंकज जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली. असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबडचे हवालदार बोबले करत आहेत.
Published by:sachin Salve
First published: