मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'माझ्या पतीने घरी काम करणाऱ्या मुलीवर अत्याचार केला, काही करा हो' , पत्नीने घडवली नवऱ्याला जेल!

'माझ्या पतीने घरी काम करणाऱ्या मुलीवर अत्याचार केला, काही करा हो' , पत्नीने घडवली नवऱ्याला जेल!

पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पहिले असता तिला धक्काच बसला होता.

पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पहिले असता तिला धक्काच बसला होता.

पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पहिले असता तिला धक्काच बसला होता.

भिवंडी, 15 डिसेंबर : भिवंडीमध्ये (bhiwandi)  गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  एका 14 वर्षीय अल्पवयीन मोलकरणीवर मालकानेच जंगलात नेऊन बळजबरीने बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना घडली समोर आली आहे. या प्रकरणी मालकाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लडकू  मुकणे असं या नराधम आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीचे सहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले तर तिची आईही पर-पुरुषासोबत एकटीला सोडून निघून गेली. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या असाह्य पीडिताला भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या आरोपीने नातवंड आणि घराच्या बकऱ्या चरण्यासाठी तिला कामाला ठेवले होते.

त्यातच मे महिन्यात पीडित मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपी मालकाने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर  बलात्कार केला. मात्र जिवाच्या भीतीने पीडित घाबल्याची पाहून आरोपी मालकाची हिंमत वाढली आणि त्यानंतर  तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता.

पीडित अल्पवीयन मुलगी मालकाचा अत्याचार जिवाच्या भीतीने सहन करीत होती. त्यातच 13 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पहिले असता तिला धक्काच बसला होता. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला पतीच्या कृत्यची हकीकत सांगत "माझ्या पतीने आमच्या घरी राहणारी मुलगी बरोबर बळजबरी संबंध केले आहेत, काहीतरी करा" असे सांगितले.  त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते येथे पोहचले. त्यांनी मुलीची सुटका केली आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी लडकूला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: