BREAKING: देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

उद्या म्हणजेच 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा राजीनामा अपेक्षित आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 09:07 PM IST

BREAKING: देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 07 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या राजीनामा देण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा राजीनामा अपेक्षित आहेत. उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली  आहे.

8 नोव्हेंबरला 13व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन होतं. पण राज्यात अद्याप सत्ता स्थापन करण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हे थेट राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सोपवणार आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग येईल.

राज्यात सध्या सत्तेवरून कठीण पेच निर्माण झाला आहे. त्यावर राजकीय सल्ला घेण्याचं काम सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्याला राजीनामा देण्याची गरज नसते. 8 तारीख संपेपर्यंत मुख्यमंत्री हे त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो.

इतर बातम्या - फोडाफोडीच्या राजकाणाची काँग्रेसलाही धास्ती, शिवसेनेपाठोपाठ आमदारांना हलवलं!

Loading...

दरम्यान, उद्या देवेंद्र फडणवीस हे थेट राज्यपालांकडे राजीनामा देतील असं सांगण्यात आलं आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यपाल देवेंद्र फडणवीस यांना काळजीपाहू मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. पण यातून देवेंद्र फडणवीस कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

एकीकडे सत्तेसाठी कोणताही मार्ग दिसत नसताना दुसरीकडे राज्यात भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरू असल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेने पाठोपाठ आता काँग्रेसनेही सावध पवित्रा घेत आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आमदार फुटण्याच्या भीतीने काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप सत्ताा स्थापन करण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमिवर आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या - ...तर ते भाजपचं पाप, युतीच्या सत्ता नाट्यावर धनंजय मुंडेंची आक्रमक प्रतिक्रिया

जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत रंगशारदा हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश शिवसेना आमदारांना देण्यात आले आहेत. मुंबईतले आमदार मात्र इथे राहणार नाहीत अशी माहिती आहे. तर इतर जिह्यातले आमदार मात्र हळूहळू जमायला लागले आहेत. असं असताना भाजप आता काँग्रेस आमदारांच्या संपर्कात असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही आमदार फुटण्याच्या भीतीने आमदारांना मुंबईत बोलावलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मोठी बातमी - धक्कादायक! 6 हल्लेखोरांनी चहूबाजूने झाडल्या अंदाधुंद गोळ्या, युवकाचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...