मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दिवाळीच्या तोंडावर पंढरपूर हादरलं, 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

दिवाळीच्या तोंडावर पंढरपूर हादरलं, 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरमध्ये अटक केली.

पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरमध्ये अटक केली.

पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरमध्ये अटक केली.

पंढरपूर, 01 नोव्हेंबर : एकीकडे दिवाळीच्या (diwali) उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये (pandharpur) महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार (gangrape) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील उघडेवारी इथं ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह उघडेवाडी गावात राहते. पीडित अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात होती. त्यावेळी वाटेत तीन नराधमांनी तिला अडवले आणि तिची छेड काढली. त्यानंतर पीडितेला बाजूला असलेल्या एका आडोशाला नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

VIDEO : Tata Punch ची डिलीव्हरी घेताना घडली मोठी चूक; नवी कार झाली खटारा!

पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर  पीडितेच्या आईने वेळापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींना पकडण्यासाठी वेळापूर पोलिसांनी पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरमध्ये अटक केली.

सारा-जान्हवीची केदारनाथ तीर्थयात्रा सोशल मीडियावर हिट; फोटो व्हायरल

मुख्य आरोपी युवराज प्रकाश गोडसे, रणजीत दत्तात्रेय कोळेकर (दोन्ही आरोपी वय 23, रा.उघडेवाडी) आणि रोहन दत्तात्रय भोसले, (वय १९ ) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी आज पंढरपूर न्यायालयात हजर केले असता सर्वांना दोन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Rape