Home /News /maharashtra /

खांबाला रुमाल बांधून खेळत होता अन् गळफास बसला, 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

खांबाला रुमाल बांधून खेळत होता अन् गळफास बसला, 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

 पूर्वेश आवटे हा मुलगा आपल्या आईवडिलांना एकुलता एक होता. तो निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

पूर्वेश आवटे हा मुलगा आपल्या आईवडिलांना एकुलता एक होता. तो निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

पूर्वेश आवटे हा मुलगा आपल्या आईवडिलांना एकुलता एक होता. तो निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 17 मे : लहान मुलं खेळत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण बुलडाण्यामध्ये (buldhana) खेळता खेळता गळफास बसल्यामुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, हा मुलगा आई वडिलांना एकुलता एक होता.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं ही घटना घडली आहे.  पूर्वेश आवटे असं 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. पूर्वेश हा आपल्या घराच्या पाठीमागे नेहमी प्रमाणे खेळत होता. आज दुपारी तो घरामागे खेळण्यासाठी गेला. यावेळी तो खांबाला रुमाल बांधून खेळत होता. पण,अचानक त्याला गळफास लागला आणि जागेवरच बेशुद्ध झाला. ही बाब त्याच्या आईने पाहिले. आईने आरडाओरडा करून घरातील सर्वांना मदतीसाठी बोलावले. (ड्रायव्हिंग लायसन्सचं वयंही नव्हतं, एकाच बाईकवर चौघांचा प्रवास, अपघात झाला अन्) पूर्वेशला  गळफास लागलेल्या स्थितीत खाली उतरवले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुर्वेश आवटे हा मुलगा आपल्या आईवडिलांना एकुलता एक होता.  पूर्वेशची आई घरकाम करत होती, तर वडील खाजगी कंपनीमध्ये काम करून नंतर भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. धक्कादायक म्हणजे,  2 वर्षापूर्वी या दाम्पत्यच्या मुलीचा देखील मृत्यू झाला होता. आता पूर्वेश निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूर्वेशच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सावकाराच्या जाचास कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाची आत्महत्या दरम्यान, खाजगी सावकारांकडून घेतलेले पैसे अव्वाच्या सव्वा व्याजासह देऊनही कुटुंबीयांना सावकाराकडून दिला जाणारा त्रास असाह्य झाल्याने, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाने गळफास घेऊन स्वतः जीवन संपवलंय. "मी हे सहन करू शकत नाही, मला माफ करा". असा व्हॉट्सअॅप मेसेज कुटुंबीयांना करत त्याने आत्महत्या केली. तर याप्रकरणी दोन आठवड्यानंतर, बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये, 5 सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तुम्हाला माहीत आहे का? मांजरीही एकमेकांना आणि माणसांना नावानं ओळखू शकतात) पंकज बबन काळे (वय 21 रा. जिजामाता चौक बीड), असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मयत पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्ताराधिकारी आहेत. त्यांनी 2019 मध्ये दहा रुपये शेकडा दराने, किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून सात लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील 60 एकर जमीन आणि बीड शहरातील पत्नीच्या नावे असणारे राहते घर सावकार पिंगळे याने लिहून नोटरी करून घेतलं होतं. त्यानंतर व्याजासह मुळ रक्कम पिंगळे यास देऊनही, सावकार पिंगळे याने बबन काळे यांच्या पत्नीवर धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 1 मे रोजी विस्ताराधिकारी असणारे, बबन काळे हे माजलगावला ध्वजारोहणासाठी गेले होते. त्या दिवशी कुटुंबातील व्यक्ती देखील बाहेर होते, मात्र मयत पंकज हा एकटाच घरी होता. सावकाराकडून घरी येऊन सततची धमकी, मारहाण याला वैतागून शेवटी पंकजने कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप द्वारे मेसेज करून, घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या