नांदेड, 26 जानेवारी : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे माहूर गडावरील रेणुका माता. दरवर्षी लाखो भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. तसेच मानलेला नवस पूर्ण झाल्यावर याठिकाणी येत असतात. त्यामुळे याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यातच आता एक अनोखी बातमी समोर आली आहे.
एका 92 वर्षाच्या वृद्ध महिलेने माहूर गड सर केला आहे. तसेच तेथून त्या खालीही व्यवस्थितपणे उतरल्या. त्यांच्या नातूने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटलंय की, "माझी आजी वय ९२ आणि आजीने माहूर गड चढला आणि उतरला पण. इच्छा होती जगदंबेला पहायची आणि डोळे भरून पाहिलं जगदंबेला, जय जगदंब", असे ट्विट या तरुणाने केले आहे. तब्बल 92 वर्षांच्या एका वृद्ध महिलेने माहूर गड सर केल्यानंतर त्यांचे कौतुक होत आहे. @iamShantanu_D या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
माझी आजी वय ९२ आणि आजीने माहूर गड चढला आणि उतरला पण इच्छा होती जगदंबेला पहायची आणि डोळे भरून पाहिलं जगदंबेला🙏🏼 जय जगदंब🙏🏼 pic.twitter.com/LGc8K3ykVH
— Shantanu | शंतनु (@iamShantanu_D) January 25, 2023
जाणून घ्या माहूरगडाबाबत -
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. ते नांदेड शहरापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता आहे .श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
एक महान तिर्थक्शेत्र व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते. रेणुका देवीचे मंदिर शहरापासुन सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या यादवाचा राजा यानी देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. दरवर्षी दसर्याच्या दिवशी रेनुकदेवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो.
हेही वाचा - अभिमानास्पद! यंदाचं महाराष्ट्राचं चित्ररथ खूपच खास; मराठमोळा संगीतकार गाजवणार कर्तव्यपथ
दुसरे शक्तिपीठ- श्री रेणुकामाता (माहूरगड)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nanded