बस, टँकर आणि क्रुझरचा विचित्र अपघात, 9 जणांचा जागेवरच मृत्यू तर 24 जखमी

बस, टँकर आणि क्रुझरचा विचित्र अपघात, 9 जणांचा जागेवरच मृत्यू तर 24 जखमी

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सोनगड शहराजवळ बस-टॅकर आणि क्रुझरचा भीषण अपघात होऊन त्यात 9 जणांचा मृत्यू जागेवर मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवापूर, 2 मार्च: नागपूर-सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत सोनगडजवळ शहराजवळ गुजरात राज्य परिवहन मंडळाची बस,टँकर आणि क्रुझरचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर 24 प्रवाशी जखमी झाले आहेत. पोखरण गावाजवळ सोमवारी संध्याकाळी हा अपघात झाला आहे. टँकर राँग साईडने येत समोरुन येणाऱ्या बसमध्ये घुसले. यात बस अर्ध्यापर्यंत कापली गेली. नंतर मागून येणारी भरधाव क्रुझर देखील बस आणि टँकरवर आदळली.

मिळालेली माहिती अशी की, अपघातग्रस्त बस कुशलगठ-सुरत-उकई अशी निघाली होती. बस सोनगडजवळील पोखरण गावाजवळ येताच समोरुन राँग साईडने येणारा टँकर आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. नंतर भरधाव येणारी प्रवाशी क्रुझरने बसला मागून धडक दिली. अपघातात 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला.

जखमींना व्यारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच गुजरात पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना बसमधून बाहेर काढून व्यारा तसेच सोनगड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचा..धक्कादायक! आदिवासी वसतिगृहातील स्वच्छतागृहात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची प्रसूती

First published: March 2, 2020, 7:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या