मानोऱ्यात भीषण आगीत नऊ घरे भस्मसात, अनेकांचा संसार उघड्यावर

मानोऱ्यात भीषण आगीत नऊ घरे भस्मसात, अनेकांचा संसार उघड्यावर

मानोरा येथे नऊ घरांना भीषण आग लागून त्यामध्ये घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावा शेजारील शेतात असलेल्या बांधावरील जैव कचरा पेटवून दिल्याने ही आग लागल्याचे समजते.

  • Share this:

किशोर गोमाशे (प्रतिनिधी)

वाशिम, 26 एप्रिल- या आगीत देवानंद वाघमारे, गुलाब मोरकर, रामराव भिसनकर, अशोक कोले, गजानन सोनोने, अरुण कांबळे, अरुण पखमोडे, सुरेखा सोनोने, महादेव कुडवे यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संसार रस्त्यावर आले आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

आगीने गावातील नऊ घरांना आपल्या कवेत घेतले. प्रसंगावधान राखत तहसीलदार सुनील चव्हाण यांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्याने आग आटोक्यात आली.

VIDEO: भाजपच्या 'या' मुस्लीम नेत्यानं साध्वी प्रज्ञांचा प्रचार करण्यास दिला थेट नकार

First published: April 26, 2019, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading