मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडमध्ये काहीही होऊ शकतं! एकाच नंबरच्या सापडल्या 9 ऑटोरिक्षा, पोलीस हैराण

बीडमध्ये काहीही होऊ शकतं! एकाच नंबरच्या सापडल्या 9 ऑटोरिक्षा, पोलीस हैराण

गेवराई शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीच्या व एकाच नंबरच्या 9 रिक्षा धावत होत्या. मात्र याची कोणालाच माहिती नव्हती.

गेवराई शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीच्या व एकाच नंबरच्या 9 रिक्षा धावत होत्या. मात्र याची कोणालाच माहिती नव्हती.

गेवराई शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीच्या व एकाच नंबरच्या 9 रिक्षा धावत होत्या. मात्र याची कोणालाच माहिती नव्हती.

बीड, 26 नोव्हेंबर :  वाहतुकीचे नियम डावलून प्रवास करणारी वाहने आपण पाहिली असतील. मात्र बीडमध्ये (beed) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ज्यामुळे अक्षरश : पोलीस (beed police) देखील चक्रावून गेले आहेत. गेवराई (gevrai) शहरांमध्ये एकाच नंबरची एक नव्हे दोन नव्हे तब्बल 9 ऑटोरिक्षा (autorickshaws ) सुरू होत्या. यामुळे खळबळ उडाली आहे.  गेवराई शहरात चालणाऱ्या या रिक्षांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे

गेवराई शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीच्या व एकाच नंबरच्या 9 रिक्षा धावत होत्या. मात्र याची कोणालाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे, रिक्षा मालक व चालक यांना देखील याची कल्पना नसल्याचं दिसून आलं. परंतु, डीबी पथकाच्या धडक कारवाईत अनेक गुन्हे उघड होत असून त्यांनी केलेल्या कारवाईत एमएच-23, टीआर-311 क्रमांकाची 9 रिक्ष्या पकडण्यात आल्या आहेत. दरम्यान याविषयी पोलिसांकडून प्रादेशिक परिवहन विभागाला माहिती देण्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करू. अशी माहिती  पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे.

आई सोडून गेली पण 10 महिन्याचे बाळ दूध पिण्यासाठी धडपडत होतं, अमरावतीतील घटना

दरम्यान, एकाच नंबरच्या 9 रिक्षा पकडल्याने या रिक्षा चोरीच्या आहेत? की एकाच परमीटवर आठ रिक्षा चालवण्यात येत होती ? याबाबत पोलिस तपास करत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाला दिली जाणारी परवानगी याबाबत तपासणी सुरू आहे.

पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय; 10 वर्षांपासून सुरू होतं कृत्य

मात्र अशा पद्धतीने प्रकार सुरू असताना पोलीस आणि इतर लोकांच्या निदर्शनास का आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गाडीची नंबर प्लेट नसणे, लायसन्स, अवैध वाहतूकवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी या एकाच नंबर च्या रिक्षावर आत्तापर्यंत का कारवाई केली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या नऊ रिक्षाचे मालक वेगवेगळे आहेत. नेमके या रिक्षाचे नंबर एकच कसे याचा शोध पोलीस घेत आहेत हे प्रकरण चोरीचे तर नाहीत ना किंवा या एकच नंबर आणखी किती रिक्षांना आहे. याचा दुसरा वापर तर केला जात नाही ना? याचा शोध पोलीस घेत आहेत.

First published: