80 वर्षांचे शरद पवार अ‍ॅक्शनमध्ये, निघाले अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजाच्या भेटीला!

80 वर्षांचे शरद पवार अ‍ॅक्शनमध्ये, निघाले अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजाच्या भेटीला!

शरद पवार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्याच्या समोर ऐन हंगामात हातात आलेले पिकं डोळ्यसमोर पाण्यात वाहून गेले आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहे.

कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली सोन्यासारखी ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पिकं पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचे नियोजन केले आहे.

मुहूर्त हुकणार? राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत अखेर एकनाथ खडसे बोलले, VIDEO

शरद पवार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे.  उद्या अर्थात 18  ते 19 ऑक्टोबर दौरा करणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेताची पाहणी करणार आहे. पहिल्या टप्प्यात हा त्यांचा दौरा असणार आहे.

राज्यावर जेव्हा जेव्हा संकट परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी नेतृत्वाची कमान आपल्या हाती घेतली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थितीत चिंताजनक आहे. पण, अशाही परिस्थितीत कोरोनाची तमा न बाळगता शरद पवार यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात जावून पाहणी केली.

कोरोनाच्या काळात शरद पवार यांनी पुण्यात अनेक बैठका घेतला होत्या. मुंबईनंतर पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे लक्ष ठेवून आहे.  दुसरीकडे शरद पवार यांनीही वेळोवेळी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सुचना दिल्या आहे. पुण्यासह मुंबई,  पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागाची पाहणी केली होती.

LIVE: जम्मू-काश्मीर: अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर धडकले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात आणि रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. अनेकांच्या घरावरील पत्र उडाले होते. तसंच काही ठिकाणी वीजप्रवाह खंडीत झाला होता. यामुळे कोकणातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.  एकीकडे कोरोनाची परिस्थिती असताना अचानक कोकणावर निसर्गाचे संकट कोसळले होते. अशा ही परिस्थितीत शरद पवार यांनी 9 जून रोजी रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली. दोन दिवसांच्या या दौऱ्यात शरद पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून नागरिक आणि शेतकरऱ्यांशी संवाद साधून सर्वांना धीर दिला. त्यानंतर नुकसानग्रस्त भागासाठी काय मदत करता येईल, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परिस्थिती लक्षातही आणून दिली.

विशेष म्हणजे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येवून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षातील नेते आणि मंत्री पदभार स्वीकारण्यात मश्गुल होते. तेव्हा शरद पवार हे नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. सांगली, कोल्हापूरमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही शरद पवार यांनी भागात जावून पाहणी केली होती.

आताही राज्यावर कोरोनाशी सामना करत असताना अस्मानी संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत 'फिल्ड'वर जाऊन लोकांना धीर देणे गरजेचं आहे, याची जाणीव ठेवून  पुन्हा एकदा शरद पवार हे दौऱ्यावर निघाले आहे.

Published by: sachin Salve
First published: October 17, 2020, 10:09 AM IST

ताज्या बातम्या