वसई, 11 मे: वसई विरार महानगरपालिकेच्या (Vasai Virar Municipal Corporation) आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वसईतल्या वरुण इंडस्ट्रीज कोविड सेंटर (Varun Industries Covid Center Vasai)मधून 80 वर्षीय रुग्ण बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पालिकेच्या उपायुक्तांनी चौकशीचे आदेश (Inquiry ordered by deputy commissioner) दिले आहेत.
वसई पश्चिमेकडील सावरकर नगरमध्ये एकटेच राहणाऱ्या रुग्णाला शेजाऱ्यांनी 22 एप्रिल रोजी वसई पूर्वेकडील वरूण इंडस्ट्रीज येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. 14 दिवसांनी जेव्हा त्यांचा उपचाराचा कालावधी संपल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांनी या रुग्णाचा कोविड सेंटरमध्ये शोध घेतला त्यांना रुग्णाचा काहीच पत्ता लागला नाही.
वाचा: Explainer : कोविड रुग्णांना होणारा Mucormycosis आजार नेमका आहे तरी काय?
या वयोवृद्ध रुग्णाच्या शोधासाठी रुग्णाच्या परिसरात राहणारे समाजसेवक नरेंद्र पाटील पाठपुरावा करीत आहेत. मात्र 10 दिवस उलटूनही महापालिकेकडे रुग्णाची कोणतीच महिती नसल्याने त्यांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या प्रकाराबाबत वसई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. किशोर गवस यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी या प्रकरणा बाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुरेखा वाळके यांनी अशी घटना घडलीच नसल्याचे सांगून कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Vasai