धक्कादायक! राज्यात 24 तासात 80 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

धक्कादायक! राज्यात 24 तासात 80 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

संपूर्ण राज्यात आतापर्यंत 1889 कोरोना रुग्ण पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत. तर आतापर्यंत 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वाधित प्रभावित झालेलं राज्य महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आणखी 80 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 1889 कोरोना रुग्ण पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत. तर आतापर्यंत 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित 1030 केस सध्या अक्टिव आहेत. तर 838 पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत बरी झाली आहे.

सांगितले जात आहे की, महाराष्ट्रात सोमवारी कोविड – 19 चे 2436 नवीन रुग्ण समोर आले आहेत. सध्या राज्यात संक्रमितांची संख्या 52,667 पर्यंत पोहोचली आहे. एका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकटामुळे आणखी 60 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 1695 पर्यंत पोहोचली आहे.

सोमवारी राज्यात 1186 रुग्णांवरील उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 14,600 जणांना प्रकृती चांगली असल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

महाराष्ट्रातील बाधित संख्या – 52667

नवी प्रकरणं – 2436

संक्रमणामुळे काल झाला मृत्यू – 1695

कोरोनामुक्त रुग्ण – 15786

आता 35,178 रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. राज्यात कोरोना व्हायरससाठी आतापर्यंत 3,78,555 लोकांची चाचणी करण्यात आली आहे.

हे वाचा -कोरोनापेक्षा अज्ञात व्हायरसचा जगाला जास्त धोका, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

'या' देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता रुग्णालयात राहिला फक्त एक कोरोना

First published: May 26, 2020, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading