मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईत अवतरला संतोष माने, सुसाट Ola कारने 8 जणांना उडवलं, शाळेतील मुलं थोड्यात वाचली, LIVE VIDEO

मुंबईत अवतरला संतोष माने, सुसाट Ola कारने 8 जणांना उडवलं, शाळेतील मुलं थोड्यात वाचली, LIVE VIDEO

सुधा पार्क परिसरातून गाडीने जात असताना अचानक त्याच्या वाहनाने वेग घेतला आणि समोर जी वाहनं येतील

सुधा पार्क परिसरातून गाडीने जात असताना अचानक त्याच्या वाहनाने वेग घेतला आणि समोर जी वाहनं येतील

सुधा पार्क परिसरातून गाडीने जात असताना अचानक त्याच्या वाहनाने वेग घेतला आणि समोर जी वाहनं येतील

    मुंबई, 22 सप्टेंबर : मुंबईतील घाटकोपर परिसरात एका ओला चालकाने तब्बल आठ जणांना जोराची धडक दिल्याची घटना घडली होती. तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने धडक दिली होती. या घटनेची व्हिडीओ आता समोर आला आहे. बुधवारी घाटकोपरच्या सुधापार्क परिसरात ही घटना घडली होती. तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने धडक दिली. दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ओला चालक हा घाटकोपरच्या कामराज परिसरातील रहिवासी आहे. राजू यादव असं त्याचं नाव आहे. तो सुधा पार्क परिसरातून गाडीने जात असताना अचानक त्याच्या वाहनाने वेग घेतला आणि समोर जी वाहनं येतील, जी व्यक्ती येईल त्यांना उडवत तो हायवेच्या दिशेला निघून गेला होता. या चालकाने रस्त्याने शाळेत चालत जाणाऱ्या लहान मुलांना देखील सोडलं नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात रोष व्यक्त केला जात होता. पोलिसांनी संबंधित प्रकरणाची दखल घेवून ओला चालकाला ताब्यात घेतलं आहे. (हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करत होता नवरा; बायकोने रंगेहाथ पकडून तिथंच दोघांना...; पाहा VIDEO) दरम्यान, जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून स्वत: परिमंडळ पाचचे उपायुक्त प्रशांत कदम राजावाडी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या