Home /News /maharashtra /

8 महिन्यापूर्वीच ठरला बंडखोरीचा कट, शिंदेंच्या पाया पडणाऱ्या मंत्र्याने दिली होती कल्पना, सेना नेत्याचा खुलासा

8 महिन्यापूर्वीच ठरला बंडखोरीचा कट, शिंदेंच्या पाया पडणाऱ्या मंत्र्याने दिली होती कल्पना, सेना नेत्याचा खुलासा

 एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार पक्ष कसे फोडू शकता असे अनेक प्रश्न निर्माण झाले

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार पक्ष कसे फोडू शकता असे अनेक प्रश्न निर्माण झाले

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार पक्ष कसे फोडू शकता असे अनेक प्रश्न निर्माण झाले

    जळगाव, 28 जून :  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde )  यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार पक्ष कसे फोडू शकता असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र, 8 महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी कल्पना दिली होती, असा असा जळगावमधील शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी केला आहे. शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन सुरत गाठले आणि त्यानंतर गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. शिंदे यांच्यासोबत 40 आमदार असल्याचे सांगितले जात आहे. अजूनही राज्यातील सेनेचे आमदार हे गुवाहाटीकडे वाट धरून आहे. बंडखोर आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे चार आमदार आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. गुलाराव पाटील यांच्या निषेध व्यक्त केला जात आहे. जळगावमध्ये शिवसेनेकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, असं वृत्त दिव्य मराठींनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेमध्ये बंड पुकारले जाणार आहे, याची कल्पना 8 महिन्यांपूर्वीच दिली होती. एवढंच नाहीतर एक मोठा मंत्री हे फोडाफोडी करणार आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते, असा खुलासा संजय सावंत यांनी केला. दरम्यान,एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि संजय राऊत असा सामना रंगला आहे. आताही संजय राऊत यांनी ट्वीट करून शिंदे गटाला डिवचलं आहे. राऊतांनी एक शायरीच्या फोटो ट्वीट करून टोला लगावला आहे.
    'जहानत एक किस्म ही मौत होती है, और जाहील लोग चलती फिरती लाशे हैं' असं म्हणत संजय राऊत यांनी 40 लोकांचे मृतदेह गुवाहाटीवरून येतील या वक्तव्यावर एका प्रकारे खुलासा केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या