शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या हॉस्पिटलला प्रशासनाने दिला जोरदार दणका

शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या हॉस्पिटलला प्रशासनाने दिला जोरदार दणका

नगरमध्ये सुरभीसह अनेक हॉस्पिटलने कोरोना काळात रुग्णांना अधिक बिले आकारली, असा ठपका ठेवण्यात आला होता

  • Share this:

अहमदनगर, 24 जानेवारी : कोरोनाबाधित (corona) रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटल (Hospital) अखेर जिल्हा प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. रुग्णांकडून  घेतलेली आठ लाख रुपयांची रक्कम अखेर सुरभी हॉस्पिटलने (surbhi hospital ahmednagar ) परत केले आहे. त्यामुळे मनसेने बॅनर दाखविण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनासाठी रविवारी शरद पवार नगरमध्ये येणार आहेत.

नगरमध्ये सुरभीसह अनेक हॉस्पिटलने कोरोना काळात रुग्णांना अधिक बिले आकारली, असा ठपका ठेवण्यात आला होता. रुग्णांना हे पैसे परत मिळावे यासाठी शरद पवार यांच्या दौऱ्यात फलक झळकवण्याचा इशारा मनसेने दिला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सुरभी हॉस्पिटलने रुग्णांचे पैसे परत केले असल्याच्या पावत्या प्रशासनास दाखविल्या आहे.

सासुरवाडीत बोलावून जावायाची हत्या, सासू-सासरे आणि बायकोला अटक

सुरभी हॉस्पिटलचे आणखी काही पैसे बाकी असून तो वाद न्यायप्रविष्ठ असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. अन्य रुग्णालयांनी सात दिवसात पैसे परत करावे अन्यथा परवाने रद्द केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नगर शहरामध्ये 17 रुग्णालयाचे ऑडिट केल्यानंतर 1099 बिलांमध्ये त्रुटी आढळून आलेले आहे आणि त्याची पुढील तपासणी केल्यावर 902 बिलामध्ये त्रुटी आल्यामुळे संबंधित 14 रुग्णालयांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. काहींनी खुलासा केला होता, काहींचा खुलासा आलेला नाही. जर नियमांचे उल्लंघन केले तर त्याला वैद्यकीय क्षेत्रातल्या मुंबई नर्सिंग होम ऍक्ट, साथरोग प्रतिबंधक कायदा व अत्यावश्यक सेवा कायदा या तीन प्रकारच्या कायद्यानुसारच प्रक्रिया करावी लागते.

मोठी बातमी: आता 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोट चालणार नाही? RBI ने दिली माहिती

जर त्या रुग्णालयांना नोटिसा देऊन त्यांनी पैसे भरलेले नसतील व त्यांचे वैद्यकीय परवाना रद्द करायचे असेल, तर कायद्यानुसार प्रक्रिया करावी लागते. कोणत्याही परिस्थितीतीत हॉस्पिटल सारख्या सेवा या तात्काळ बंद करता येत नाही म्हणून आम्ही ज्या रुग्णालयांनी पैसे भरले नाहीत, त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. पैसे जमा करण्याची मुदत त्यात देण्यात आली होती, त्यानुसार रुग्णाच्या खात्यात पैसे ज्यांनी जमा केले नाहीत, त्यांना संबंधित 3 कायद्यानुसार, नोटीस बजावून त्यांचे रितसर म्हणणे आम्ही पुन्हा मागून घेणार आहोत, व ते आल्यानंतरच पुढे कोणती कारवाई करायची, यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: January 24, 2021, 10:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या