मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /13 खून, 21 चकमकी, 8 लाख बक्षीस असलेली माओवादी जोडीचं अखेर आत्मसमर्पण!

13 खून, 21 चकमकी, 8 लाख बक्षीस असलेली माओवादी जोडीचं अखेर आत्मसमर्पण!

विनोद बोगा याच्यावर खूनाचे 13, चकमकीचे 21, जाळपोळ 01 व इतर 05 असे गुन्हे दाखल आहे. तर पत्नी कविता हिचेवर चकमकीचे 05...

विनोद बोगा याच्यावर खूनाचे 13, चकमकीचे 21, जाळपोळ 01 व इतर 05 असे गुन्हे दाखल आहे. तर पत्नी कविता हिचेवर चकमकीचे 05...

विनोद बोगा याच्यावर खूनाचे 13, चकमकीचे 21, जाळपोळ 01 व इतर 05 असे गुन्हे दाखल आहे. तर पत्नी कविता हिचेवर चकमकीचे 05...

गडचिरोली, 30 जुलै : गडचिरोलीसह (gadchiroli) देशभरातल्या माओवादप्रभावीत भागात माओवाद्यांचा (maoist) शहीद सप्ताह सुरू आहे. या शहीद सप्ताहात आज 8 लाख रुपये बक्षीस असलेल्या 2 जहाल माओवाद्यांनी (maoist surrender) आज गडचिरोली पोलिसांसमोर (gadchiroli police) आत्मसमर्पण केले आहेय हे दोघेही पती-पत्नी ( Maoist couple) आहेत. या दोघांच्या आत्मसमर्पणाने माओवादी चळवळीला हादरा बसला आहे.

गेल्या दोन वर्षात 49 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहेय देशातल्या दंडकारण्यासह माओवादप्रभावीत भागात माओवाद्यांचा 28 जुलैपासून शहीद सप्ताह सुरू झाला आहे. या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज गडचिरोलीत पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या समक्ष 8 लाख रुपये बक्षीस असलेल्या 2 जहाल माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे   माओवादी दाम्पत्यामध्ये विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा तसंच त्याची पत्नी कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची या दोघांचा समावेश आहे.

ठाकरे सरकारचा सरकारी बाबूंना दणका, मंत्रालयातील 103 अधिकाऱ्यांच्या बदल्या!

यात विनोद उर्फ मनीराम नरसु बोगा हा कोरची तालुक्यात ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बोटेझरी येथील रहिवासी आहे. विनोद बोगा दहा वर्षापूर्वी माओवादी चळवळीत दाखल झाला होता. सध्या विनोद कोरची दलममध्ये एरिया कमेटी मेम्बर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोद बोगा (vinod boga) याच्यावर खूनाचे 13, चकमकीचे 21, जाळपोळ 01 व इतर 05 असे गुन्हे दाखल आहे. तर पत्नी कविता हिचेवर चकमकीचे 05, जाळपोळ 01 व इतर 03 असे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस दलाच्या विरोधात झालेल्या अनेक चकमकीच्या घटनामध्ये विनोदचा प्रत्यक्ष सहभाग होता, अशी माहिती पुढे आली आहे. सरकारने  विनोद बोगा याच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस ठेवले तर कविता कोवाची हिच्यावर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. ऐन शहीद सप्ताह सुरू असताना या माओवादी दाम्पत्यांनी आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला हादरा बसला आहे.

IND vs SL : फेवरेट खेळाडूचा फ्लॉप शो, द्रविड म्हणतो, 'तोदेखील निराश असेल'

गडचिरोली पोलीस दलाने सरकारने सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेचा योग्य पध्दतीने प्रसार केला असून माओवाद्याच्या अनेक मोठ्या नेत्यासह दलम सदस्यांनी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. पोलिसांनी अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९  ते २०२१ सालामध्ये एकूण ४३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामध्ये ४ विभागीय सदस्य, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, ३३ दलम सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

आयर्लंडमध्ये शेकडो वर्षं जुनं शिवलिंग, पाहा रहस्यमय शिवलिंगाचा इतिहास

माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असून दोन दिवसात कुठलीही मोठी हिंसक घटना माओवाद्यांना करता आली नाही. गडचिरोली पोलीस दलाचे माओवाद विरोधी पथक सी सिक्स्टी कमांडो जवानांचे अतिदुर्गम अतिसंवेदनशील भागात माओवादविरोधी अभियान सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर पोलीसानी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान गुरुवारी तेलंगणातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र, तेलंगणा सीमेवर असलेल्या प्राणहीता नदीच्या पुल परिसराला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

First published:
top videos