लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, आठ जणांचा मृत्यू, 24 गंभीर जखमी

लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, आठ जणांचा मृत्यू, 24 गंभीर जखमी

लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यु झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

गडचिरोली, 20 जून- लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील नेलसनार येथे बुधवारी रात्री हा अपघात झाला आहे. लग्नाच वऱ्हाडाच्या पिकअपला दुसऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, आठ जणांचा जागीच मृत्यु झाला. गंभीर जखमींना उपचारासाठी बिजापूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

पुलावरून जीप नदीत कोसळली, 6 महिलांचा जागीच मृत्यू

भंडारा जिल्ह्यात काळ्या पिवळ्या जीपचा मंगळवारी (18 जून) भीषण अपघात झाला होता. या अपघातात 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. पुलावरून जात असताना अचानक गाडी खोल नदीत कोसळली. यामध्ये पाच ते सहा प्रवासी जखमी असल्याची माहितीही सूत्रांना दिली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावालगत असलेल्या पुलावर जीप थेट 80 फूट खोल नदीत पडली होती. गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. जीपमधील प्रवासी साकोली येथून लाखापूर येथे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये 5 मुली आणि एका महिलेचा समावेश आहे.

मद्यधुंद महिलेचे भररस्त्यात तमाशा, VIDEO व्हायरल

Tags:
First Published: Jun 20, 2019 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading