मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रायगड समुद्र किनाऱ्यावर 3 दिवसांत सापडले 8 मृतदेह, P305 बार्जवरील कर्मचारी असल्याची शक्यता

रायगड समुद्र किनाऱ्यावर 3 दिवसांत सापडले 8 मृतदेह, P305 बार्जवरील कर्मचारी असल्याची शक्यता


मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत.

रायगड, 23 मे : तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर P305 बार्ज (P305 barge) बुडाले आहे. अद्यापही मृत कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. रायगड (Raigad) समुद्र किनाऱ्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह (Dead body) सापडले आहेत. हे मृतदेह पी 305 बार्जवरील कर्मचाऱ्यांचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलिबाग तालुक्यात शनिवारी सात, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक असे पुरुष जातीचे आठ मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे खोल समुद्रात बुडालेल्या पी 305 बार्जवरील मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने ओएनजीसी आणि मुंबई पोलिसांनी माहिती कळवली आहे.

आईच्या मृत्यूनंतर सांत्वनासाठी माहेरी आलेल्या मुलीवर काळाचा घाला, भावुक कथा

सध्या हे आठही मृतदेह अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ओएनजीसी पथक नातेवाईकांना घेऊन रायगडात येणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. तालुक्यातील नवगाव दोन, सासावणे दिघोडी एक, आवास एक तर किहीम समुद्रकिनारी तीन तर मुरुड समुद्रकिनारी एक असे आठ मृतदेह वाहून समुद्र किनारी आले आहेत. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. तसंच ओएनजीसी अधिकाऱ्यांना ओळख पटविण्यासाठी येण्यास कळविले आहे, असे पोलीस निरीक्षक सोनके यांनी सांगितलं आहे.

समुद्रात बुडालेले P305 बार्ज अखेर सापडले

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळात भक्षस्थानी सापडलेले मुंबई हाय जवळ समुद्रात बुडालेल्या P305 या बार्जचा शोध अखेर लागला आहे. अरबी समुद्रात खोल समुद्राच्या पोटात 30 मीटर अंतरावर नौदलाच्या INS मकर या युद्धनौकेने अत्याधुनिक सोनार रडारच्या सहाय्याने या बार्जचा शोध लावला आहे.

शेतकरी कुटुंबाला बांधावर बेदम मारहाण, 2 दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही, VIDEO

मागील रविवारी दुपारी 'तौत्के' चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्याप्रमाणात सुरू झाला होता. त्यावेळी मंबई हाय या तेलउत्खनंन प्रकल्पाच्या शेजरीच समुद्रात 3 नांगर टाकुन उभा असलेला बार्ज P305 उसळलेल्या लाटांमुळे जोरदार हेलखावे खाऊ लागला होता. अजस्त्र लाटा बार्जच्याही वरून जाऊन तडाखे देऊ लागल्या होत्या. त्यामुळे बार्जचे तीनही नांगर तुटले आणि जवळच्याच मुंबई हाय तेलउत्खनंन प्रकल्पाच्या मोठ्या खांबाला धडकले. त्यामळे बार्ज तीरपा होऊन बूडू लागला. त्यावेळी बार्जवरील घाबरलेल्या 261 लोकांपैकी काहींनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या. पण उधाणलेल्या समुद्रात ते दूरवर वाहून गेले. आणि त्यातच त्यांचा मृत्यूही झाला. आतापर्यत 66 जणांचे मृतदेह सापडलेत तर उर्वरीत बेपत्ता 9 लोकांचा शोध अजूनही नौदलाचे जवान घेत आहेत. नौदलाने आतापर्यंत 186 लोकांना या दूर्घटनेतून वाचवले आहे.

First published:

Tags: Raigad