लाखो कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचं न्यू इयर गिफ्ट, 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू

लाखो कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचं न्यू इयर गिफ्ट, 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे 23% वेतनवाढ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे 23% वेतनवाढ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 17 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 7 लाखांपेक्षा जास्त पेन्शन धारकांना याचा लाभ होणार आहे. या सगळ्यामुळे दरवर्षी जवळपास २१ हजार ५३० कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.

नवीन वर्षापासून सातवा वेतन आयोग लागू व्हावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा असावा आणि सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्षं करण्यात यावी या त्यांच्या मुख्य मागण्या होत्या. तसंच  रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावीत अशी मागणीही  महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाने केली होती.

सातवा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांची मागणी होती. सरकारने होकार दिला होता पण त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नव्हती त्यामुळे कर्मचारी नाराज होते.

1 जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा वित्तमंत्री दीपक केसरकर यांनी 30 नोव्हेंबरला केली होती.

सातवा वेतन आयोग करण्यात यावा, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळं हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत दीपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली.

दरम्यान, सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी काही दिवसांपूर्वी संपावर गेले होते. त्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. या संपाच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात मोठी खडाजंगी रंगली होती.

संपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संप करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी भूमिका दिवाकर यांनी घेतली तर आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका विनोद तावडे यांनी घेतली. याच्यावर या दोघांमघ्ये खडाजंगी झाली होती.

सरकारी कर्मचारी संघटनेत 5 लाख सरकारी, अडीच लाख जिल्हा परिषद, 7 लाख शिक्षक, नगर पालिका आणि महापालिका असे एकूण 17 लाख कर्मचारी संपावर गेले होते.

VIDEO: अमितच्या लग्नाला मोदींना बोलवणार का? राज ठाकरे म्हणतात...

First published: December 27, 2018, 1:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading