मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

55 खातेदारांच्या अकाउंटमधून परस्पर लांबवले 78 लाख; मॅनेजरसह चौघांवर गुन्हा, सोलापुरातील घटना

55 खातेदारांच्या अकाउंटमधून परस्पर लांबवले 78 लाख; मॅनेजरसह चौघांवर गुन्हा, सोलापुरातील घटना

Money Fraud in Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळनेर शाखेतील 55 खातेदारांच्या बँक खात्यातून 78 लाख 19 हजार 529 रुपये परस्पर लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बँक मॅनेजरसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुढे वाचा ...
    माढा, 06 मार्च: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Solapur District Central Co.Op Bank) पिंपळनेर शाखेतील 55 खातेदारांच्या बँक खात्यातून 78 लाख 19 हजार 529 रुपये परस्पर लांबवल्याची (78 lakh fraud) धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बँक मॅनेजरसह चौघांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. आरोपींनी मृत व्यक्तीच्या खात्यातील, मुदत ठेव पावत्या, शेती कर्जातील रक्कम परस्पर काढून घेतली आहे. दरम्यान एक खातेदार बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी बऱ्याच लोकांच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शाखाधिकारी नवनाथ दगडे, क्लार्क चतुर्दास बैरागी, बँक इन्स्पेक्टर अनिल बाबर आणि क्लार्क दत्तात्रय वरपे असं गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावं आहे. संबंधित आरोपींनी आपसात संगनमत करून खातेदारांच्या खात्यातून लाखोंची रक्कम परस्पर काढून घेतली आहे. या प्रकरणी सीनिअर बँक इन्स्पेक्टर व्यंकटराव मदनराव पाटील यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. हेही वाचा-आली लहर अन् केला कहर; पठ्ठ्याने साडेतीन एकरांत फुलवली अफूची शेती, पोलीसही हैराण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक खातेदार तानाजी लक्ष्मण सरकाळे हे 18 नोव्हेंबर 2021 रोजी पासबुक घेऊन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळनेर शाखेत गेले होते. यावेळी त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण बँकेत पैसे नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं, तसेच पासबुकवरील रक्कम बँकेतील संगणकावर दिसत नव्हती. यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर संबंधित आरोपींनी संगनमताने खातेदारांच्या अकाउंटमधील पैसे लांबवल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा-188 मुलांचा बाप असल्याचं सांगत थेट सरकारलाच फसवलं, 19 कोटी रूपयांचा गंडा आरोपींनी पिंपळनेर शाखेतील एकूण 55 खातेदारांच्या अकाउंटमधून 78 लाख 19 हजार 529 रुपयांची रक्कम परस्पर लांबवली आहे. आरोपींनी सर्वप्रथम खातेदारांच्या अकाउंटमधील रक्कम ओळखीच्या आणि मित्रांच्या अकाउंटवर वळती केली. त्यानंतर ही रक्कम परस्पर काढून घेत याचा वैयक्तिक कारणांसाठी खर्च केला आहे. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Financial fraud, Solapur

    पुढील बातम्या