मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जालन्यात आठवड्याभरात कोरोनामुळे 75 मृत्यू, लॉकडाऊन लागणार का?

जालन्यात आठवड्याभरात कोरोनामुळे 75 मृत्यू, लॉकडाऊन लागणार का?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जालन्यात (Jalana) कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जालन्यात (Jalana) कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जालन्यात (Jalana) कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही.

जालना, 11 मे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जालन्यात (Jalana) कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यात तब्बल साडे पाच हजार नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 75 जणांचा कोरोनाने बळी देखील गेला आहे. त्यामुळे जालन्यात लॉकडाऊनची (Jalana Lockdown) मागणी होत आहे.

राज्यासह जिल्ह्यात 15 एप्रिलपासून ब्रेक द चेन अंतर्गत अनेक निर्बंध लावण्यात आले होते. परंतु, त्याचा पाहिजे तेवढा प्रभाव दिसून आला नाही. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी अखेर कडक पाऊले उचलत निर्बंध अधिक कडक करत आरोग्यसेवा वगळता सकाळी 11 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली.

पुण्यात मोलकरणीनं लंपास केले घरातील 4 लाखांचे दागिने; असं फुटलं बिंग

दरम्यान, संचारबंदी देखील पायदळी तुडवत जालनेकर या ना त्या बहाण्याने निर्धास्तपणे मुक्तसंचार करताना पाहायला मिळत आहेत. संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई आणि रस्त्यातच अँटीजेन टेस्टच्या कारवाया देखील पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या. मात्र, नियमांना जुमाननार ते जालनेकर कसले.

लॉकडाऊन असताना देखील जालन्यातील बाजारपेठेत लपून-छपून का होईना व्यवहार सुरू असतात. लॉकडाऊन काळात लपून छपून दुकाने सुरू ठेवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाया करून अनेक दुकाने सील देखील करण्यात आले. मात्र जालनेकरांचा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरूच आहे.

कोरोना काळात धोकादायक ठरू शकतात असे Fungus diseases

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 54 हजाराच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत 873 जणांचा कोरोनाने बळी देखील घेतला. गेल्या आठवड्याभरातील आकडेवारी पाहता तब्बल साडे पाच हजार नवीन कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची भर पडली असून 75 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचं दाहक वास्तव समोर येतंय. मात्र, मस्तमौला जालनेकरांना याचा कुठलाच सोयरसुतक दिसत नाही.

ज्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राजेश टोपे यांनी आता ठोस पाऊले उचलित जालन्यात कडक लॉकडाऊन लावून त्याची काटेकोर अंमलबजावणी करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

First published:
top videos