70 वर्षाच्या सुपरआजीची सायकल भ्रमंती

70 वर्षाच्या सुपरआजीची सायकल भ्रमंती

बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षाची सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे.

  • Share this:

22 जून : बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षाची सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आतापर्यंत या सुपरआजीने माहूरगड, तसेच वैष्णोदेवीपर्यंतचा तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवासी मागील दोन वर्षात पूर्ण केलाय. आणि यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे.

रेखा जोगळेकर असं या सुपर आजीचं नाव असून समाजात सुपर आदर्श घडवत आजीबाईने M.A. B. ed.पर्यंतचं शिक्षण केलेलं आहे. अगोदरपासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषदेला तब्बल 30 वर्ष केंद्र प्रमुख म्हणून काम सुद्धा या सुपर आजीने केलं आहे.

त्यामुळे संसाराचा गाढा यशस्वीरित्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्तीनंतर काहीतरी अनोखं करण्याची जिद्द घेऊन ह्या सुपरआजीनं गेल्या 3 वर्षापासून भारत भ्रमंतीचा प्रवास सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 01:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading