• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • अपंग लेकरासाठी 70 वर्षांच्या रत्नाआजी आजही चालवताय पंक्चरचं दुकान!

अपंग लेकरासाठी 70 वर्षांच्या रत्नाआजी आजही चालवताय पंक्चरचं दुकान!

अपंग मुलगा आणि पतीसाठी 70 व्या वर्षातही पंक्चर काढून चालवत आहेत संसाराचा गाडा, सांगलीच्या रत्नाबाई आजींची कहाणी...

अपंग मुलगा आणि पतीसाठी 70 व्या वर्षातही पंक्चर काढून चालवत आहेत संसाराचा गाडा, सांगलीच्या रत्नाबाई आजींची कहाणी...

अपंग मुलगा आणि पतीसाठी 70 व्या वर्षातही पंक्चर काढून चालवत आहेत संसाराचा गाडा, सांगलीच्या रत्नाबाई आजींची कहाणी...

  • Share this:
सांगली, 07 सप्टेंबर : 'जो काम करतो, तो कधी उपाशी राहत नाही', असं आपण नेहमी म्हणतो, पण सांगलीच्या (sangali) रत्नाआजींची (ratna aaji) कहाणी जरा वेगळी आहे. वयाच्या 70 व्या वर्षातही रत्नाबाई संसाराचा गाडा हाकत आहेत. आपला अपंग मुलगा आणि पती यांच्यासाठी त्या उतार वयात सुद्धा पंक्चर काढून उदर्निवाह करत आहे. रत्नाबाई रामचंद्र जंगम (ratanabai jangam) या सत्तरीकडे झुकल्या तरीही त्या स्वाभिमानाने व्यवसाय करत आहेत. त्यांचा सांगलीच्या 100 फुटी रोडवर जंगम पंक्चर दुकान आहे. त्यांचं हे दुकान सकाळी 10 वाजता सुरू होते आणि रात्री  8 वाजता बंद होते. पण पंक्चर काढण्याच्या या व्यवसाय पुरुष मंडळी आपण पाहतो. पण रत्नाबाई आजींना हा व्यवसाय त्यांना पोटासाठी आणि कुटुंबासाठी भाकरी देतोय. याच दुकानावर त्यांच्या 3 मुली पदवीधर झाल्या आणि लग्न करून सासरी गेल्या. मुंगीमुळे महाभारत! बिझनेस क्लासमध्ये होत्या मुंग्याच मुंग्या, विमानात गोंधळ तर, रत्नाबाई याचा मोठा मुलगा दीपक ऐन तारुण्यात निघून गेला आणि त्याने सुरू केलेला पंक्चर व्यवसाय पती रामचंद्र सांभाळू लागले. मात्र त्यांना शारीरिक मर्यादा येऊ लागल्याने ग्राहक परत जाऊ लागले. त्यात घराचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न कमी होते. त्यात घरात एक अपंग मुलाचे संगोपन. याचा विचार करून रत्नाबाई आज्जीने 20 वर्षी आधी पंक्चर काढण्याचं हळूहळू शिकून घेतलं आणि आपल्या पती बरोबर व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्यांनी या परिसरातील दुचाकी, तीन चाकी, रिक्षाचालक रत्नाआजीने जोडले आहेत. आजीकडे हे लोक आपली गाडी पंक्चर दुरुस्तीसाठी घेऊन येत असतात. रत्नाआजी दिवसाकाठी 300 ते 350 रुपये मिळून जातात. त्यातून त्या आपला संसार चालवत आहेत. IND vs ENG : सिराजने सोडला हमीदचा सोपा कॅच, विराट म्हणाला, 'हे बिल...' रत्नाआजीना पाच मुलं तीन मुली आणि दोन मुलं. एक मुलगा देवाघरी गेला आणि एक अपंग, तर तीन मुलीची लग्न झाली आहेत. त्यामुळे रत्नाआजी त्याचे पती आणि एक अपंग मुलगा असे तिघेच घरात राहतात.  त्याची शासनाकडे एकच अपेक्षा आहे. ती म्हणजे, अपंग मुलाला आधार कार्ड उपलब्ध होत नाही आणि शासनाच्या काही सवलतीपासून तो वंचित आहेत. त्यामुळे त्याला आधारकार्ड मिळावे, एवढीच त्यांची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. पण, आजींनी हे काम करतच राहणार असंही ठामपणे सांगितलं.
Published by:sachin Salve
First published: