मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आई-वडील गेले देवदर्शनाला अन् मागे काळानं घातला घाला, झोका खेळताना फास बसून 7 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

आई-वडील गेले देवदर्शनाला अन् मागे काळानं घातला घाला, झोका खेळताना फास बसून 7 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

अक्कलकोटमध्ये एका सात वर्षीय चिमुरडीचा झोका खेळताना फास बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई वडील देव दर्शनासाठी गेले असताना मागे काळाने घाला घातला आहे.

  • Published by:  News18 Desk

अक्कलकोट, 26 एप्रिल: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट याठिकाणी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आई वडील देव दर्शनाला गेले असताना, मागे काळाने घाला घातला आहे. येथील एका सात वर्षीय चिमुरडीचा झोका खेळताना फास बसून मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संबंधित घटनेचा पुढील तपास अक्कलकोट पोलीस करत आहेत.

संबंधित घटना रविवारी (25 एप्रिल) सकाळी नऊच्या सुमारास शहराच्या हद्दवाढ भागातील एका वसाहतीत घडली आहे. अभिलाषा शिवपुत्र गुरव असं या मृत मुलीचं नाव असून ती अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील समर्थ विहार परिसरात राहते. रविवारी सकाळी मृत मुलीचे वडील शिवपुत्र गुरव आपल्या पत्नीला घेऊन शहरातील खंडोबा मंदिरात देव दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांची दोन मुलं घरीच होती. आई वडील देवदर्शनांसाठी गेले असता, मागे त्यांच्या मुलीवर काळाने घाला घातला आहे.

आई वडील मंदिरात गेल्यानंतर, सात वर्षीय मृत मुलगी अभिलाषा घरात साडीने बांधलेला झोका खेळत होती. तर तिचा भाऊ आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. यावेळी झोका खेळताना अचानक तिच्या गळ्याला झोक्याचा फास बसला. पण तिला वाचवण्यासाठी घरात कोणीच नसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पावणेदहाच्या सुमारास तिचे आई वडील जेव्हा देवदर्शन करून माघारी परतले, तेव्हा घराचा मुख्य दरवाजा बंद होता. अनेकदा कडी वाजवूनही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आई वडीलांनी पारीच्या साह्याने दरवाजा तोडला.

हे ही वाचा-धक्कादायक! आईच्या शेजारी झोपलेल्या बहिणीला सख्ख्या भावाने झोपेतच संपवल

घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांची मुलगी अभिलाषा ही फास बसलेल्या अवस्थेत झोक्याला लोंबकळताना त्यांना दिसली. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तत्काळ तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Death, Solapur