Home /News /maharashtra /

घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्यांना पिकअप व्हॅनने चिरडले, 7 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू

घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्यांना पिकअप व्हॅनने चिरडले, 7 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू

गोंडपिंपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे इथं घटना शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

हैदर शेख,प्रतिनिधी चंद्रपूर, 01 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी  तालुक्यात भरधाव पिक अप व्हॅनने घरासमोर खेळत असलेल्या 3 लहान मुलांना चिरडण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका 7 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे इथं घटना शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर ही मन हेलावून टाकणारी अपघाताची रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घटना घडली आहे. या मार्गावर पंढरी मेश्राम यांचे घर आहे. घरासमोर अलेशा मेश्राम (7), अस्मित मेश्राम (10) आणि माही रामटेके (12) हे तीन लहान मुलं खेळत होती. त्यावेळी या मार्गावरुन मालवाहतूक करणारी एक पिकअप व्हॅन भरधाव वेगाने जात होते. पंढरी मेश्राम यांच्या घराजवळ पिक अप व्हॅन चालवणाऱ्या चालकाचा अचानक ताबा सुटला आणि गाडी थेट मेश्राम यांच्या अंगणात शिरली. यावेळी घरासमोर खेळत असलेल्या अलेशा, अस्मित आणि माही यांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, भरधाव पिकअप व्हॅनने त्यांच्या घरासमोरील भिंती, रस्त्यावरील खांबाला धडक देत उलटला. या धडकेत पिकअप व्हॅनने रस्त्यावरील पोलही आडवे केले. या धुमश्चक्रीत ही तीन लहान चिमुरडी सापडली. पिकअप व्हॅनच्या धडकेत अलेशा मेश्रामचा जागीच मृत्यू झाला. तर अस्मित मेश्राम (10) आणि माही रामटेके (12) हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. चिमुरडी मृत्यूमुळे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थिती लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. स्थानिकांनी जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून गोंडपीपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: अपघात, चंद्रपूर

पुढील बातम्या