फलटण, 5 फेब्रुवारी : फलटण तालुक्यातील सपकाळवाडी येथील बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय कल्पेश भाऊसो सपकाळचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. याप्रकरणी पांडुरंग सदाशिव घाडगे याला पोलिसांनी सोमवारी अटक केली.
कल्पेश 31 जानेवारीला घरातून खेळण्यासाठी बाहेर गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. नातेवाईकांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. शेवटी आई रंजना सपकाळ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. फलटण ग्रामीण पोलिसांनी परिसरात कसून चौकशी केली असता कल्पेशला पांडूरंग घाडगेसोबत पाहिल्याचे समजले. त्यानंतर पांडूरंगला ताब्यात घेऊन चौकशीवेळी त्याने जमिनीच्या हव्यासापोटी कल्पेशचा खून केल्याची कबुली दिली.
अंगणात खेळणाऱ्या कल्पेशला पांडुरंगने वडापावचे अमिष दाखवलं होतं. त्यानंतर कल्पेश त्याच्यासोबत गेला होता. तेव्हा अज्ञात स्थळी कल्पेशचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेह विहिरीत टाकला अशी कबुली पांडुरंगने पोलिसांना दिली. अपहरण करुन खून केल्याप्रकरणी पांडुरंग घाडगेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस करत आहेत.
Special Report : ऑनलाईन बँकिंग करताना सावधान! या एका गोष्टीमुळे होईल मोठं नुकसान