BMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

BMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबईतील मालाड येथील इटालियन कंपनीच्या शेजार असलेल्या नाल्याच्या मॅनहोलमध्ये 2 वर्षाचा चिमुरडा पडून तो बेपत्ता असताना धारावीत नाल्यात पडून 7 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै- मुंबईतील मालाड येथील इटालियन कंपनीच्या शेजारी असलेल्या नाल्याच्या मॅनहोलमध्ये 2 वर्षाचा चिमुरडा पडून तो बेपत्ता असताना मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) गलथानपणाने तिसरा बळी घेतला आहे. धारावीत अनाधिकृत झोपड्या बांधल्या जाऊ नये म्हणून केलेल्या खड्ड्यात पडून एका 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

सुमित मुन्नालाल जैस्वाल असे या मुलाचे नाव आहे. स्थानिकांनी त्यांना नाल्यातून बाहेर काढले. पण, तो बेशुद्धावस्थेत होता. सायन हॉस्पिटलमध्ये त्याला हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धारावीच्या पिवळ्या बंगल्याजवळही ही घटना घडली आहे. नाल्यात पडून मृत्यू झाल्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे.

धारावी परिसरातील निसर्ग उद्यानाजवळ मिठीनदीत पडून सुमितचा मृत्यू झाला आहे. मिठीनदी रुंदीकरणासाठी बीएमसीने गेल्या महिन्यात अनधिकृत बांधकाम तोडले होते. त्यावेळी नव्या झोपड्या बांधल्या जाऊ नये म्हणून भरणीला खड्डे करुन ठेवले होते. त्याच खड्यात पडून या सुमितचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याची आई सीमाने केला आहे. सीमा यांनी सांगितले की, मुलं रोजच खेळायला जायची. आजही सुमित भावाला घेऊन खेळायला गेला होता. आता आपल्याला न्याय कोण देणार, असा सवाल सीमा यांनी केला आहे.

दरम्यान, मालाड येथे दिव्यांश सिंग हा 2 वर्षाचा चिमुरडा मॅनहोलमध्ये बुधवारी (10 जुलै) रात्री पडला होता. मात्र, सर्व प्रयत्न करूनही अद्याप त्याचा शोध लागला नाही. 4 वेगवेगळ्या पथकांकडून दिव्यांशचा शोध घेतला जात आहे. अखेर दिंडोशी पोलिस ठाण्यात दिव्यांश सिंगच्या पालकांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्‍ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांश गोरेगाव पूर्वेतील आंबेडकर चौक येथील गटारात पडून वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली होती. महापालिका प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफ पथकाकडून तपास सुरु आहे. आजच्या सहाव्या दिवशी ही पालिका प्रशासनाकडून शोध मोहिम सुरू होती. पण अद्याप दिव्यांशचा शोध लागला नसल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दिंडोशी पोलिसांनी भादंवि 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

VIDEO:मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम

First published: July 15, 2019, 9:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading