भीषण अपघात: ट्रॅक्टर नदीत कोसळला, 7 ऊसतोड मजूरांचा मृत्यू; अनेकांचे संसार उघड्यावर

भीषण अपघात: ट्रॅक्टर नदीत कोसळला, 7 ऊसतोड मजूरांचा मृत्यू; अनेकांचे संसार उघड्यावर

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील बेळगावजवळ ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

कोल्हापूर,8 फेब्रुवारी: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील बेळगावजवळ ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे. या अपघातात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व ऊसतोड मजूर असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळची ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे अनेक ऊसतोड कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रित सुटल्याने हा भीषण अपघात झाला. जखमी मजुरांवर तातडीने बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ऊसतोड करणारे कामगार ट्रॅकटरमधून इटगी गावनजीकच्या बाहेरील रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टरचा पुलाच्या कठड्याला धडक बसून तो थेट नदीत कोसळला. यात चार जणांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मयत बोगुर गावचे राहणारे आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

ही दुर्घटना नंदगडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तंगव्वा हुंचेन्नत्ती, अशोक केदारी, शांतवा अल्गोडी, गुलाबी हुंचीकट्टी, नागाव्वा मातोळे, शांतव्वा बिझोरे, नीलव्वा मुत्नाळ अशी मृतांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

First published: February 8, 2020, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading