Home /News /maharashtra /

पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या, बीडमधील संतापजनक घटना

पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या, बीडमधील संतापजनक घटना

एकीकडे गौरीचं आगमन झालं आहे, या उत्सवाच्या काळात माहेरी आलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकीकडे गौरीचं आगमन झालं आहे, या उत्सवाच्या काळात माहेरी आलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकीकडे गौरीचं आगमन झालं आहे, या उत्सवाच्या काळात माहेरी आलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड, 13 सप्टेंबर : पोलीस दलातील (police) पतीच्या सतत मारहाणीच्या जाचास कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवतीने गळफास (pregnant woman commits suicide ) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड (beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील दरडवाडी येथे घडली आहे. एकीकडे गौरीचं आगमन झालं आहे, ऐन या उत्सवाच्या काळात माहेरी आलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ज्योती गोविंद जाधवर असं मयत महिलेचं नाव आहे. तिच्या पोटात 7 महिन्याचे बाळ होते. केज तालुक्यातील दरडवाडी येथील ज्योतीचा पाच वर्षांपूर्वी विवाह सोलापूर जिल्ह्यातील उक्कडगाव येथील गोविंद जाधवर या पोलीस दलात नोकरी करणाऱ्या तरुणा सोबत झाले होते. 'नारीशक्ती' म्हणत रिया चक्रवर्तीने शेअर केला ग्लॅमरस लुक, चाहत्यांनी केलं कौतुक लग्नावेळी 15 लाख रुपये हुंडा दिला. मात्र ट्रॅक्टर घेण्यासाठी आणखी पैसे घेऊन ये, या मागणीसाठी पती गोविंद वारंवार ज्योतीला मारहाण करत होता दोन दिवसांपूर्वी ज्योतीला पतीने मारहाण करून रात्री तीनच्या सुमारास माहेरी दरडवाडी येथे सोडून गोविंद जाधवर हा गावी परत गेला होता. रविवारी मुलीने घरातील वडील भाऊ आई व इतर सदस्य शेतात गेल्याचे औचित्य साधून घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, ज्योती या गर्भवती होत्या. पोटामध्ये सात महिन्याचे बाळ देखील होते. गेल्या 3 वर्षांमध्ये पती, सासू, सासऱ्यासह दिराचा सतत जाच सुरू होता. रात्रीच्या तीन वाजता मुलीच्या पतीने मुलीला माहेरी सोडले, मुलीला सतत मारत असे घरातील सासू सासरे, दीर देखील सतत जाच करत असत, असं मृत ज्योतीचा भाऊ बबन दराडे यांनी सांगितलं. कोरोनाच्या दोन डोसनंतर आता BOOSTER DOSE ची गरज? वाचा, तज्ज्ञांचं नेमकं मत 'ज्योतीचा पती हा उस्मानाबाद पोलीस दलामध्ये कार्यरत असून कायद्यामध्ये काम करणाऱ्या रक्षकाने पत्नीला जाच केला. त्यामुळे आत्महत्या झाली असा आरोप परिवारातील सदस्य करत आहेत. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी केज ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Woman suicide

पुढील बातम्या