वर्ध्यात कारचा भीषण अपघात; आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा आविष्कारसह मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
वर्ध्यात कारचा भीषण अपघात; आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा आविष्कारसह मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
या घटनेत मरण पावलेले सर्व सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचे पुत्र आविष्कार रहांगडाले यांचाही मृत्यू झाला आहे
नरेंद्र माटे, प्रतिनिधीवर्धा 25 जानेवारी : जिल्ह्यातील सेलसुरा येथे एक भीषण अपघात (Wardha Accident) झाला आहे. या अपघातात 7 लोकांचा जागीच मृत्यू (7 Students Died in Accident) झाला आहे. या घटनेत चारचाकी देवळी येथून वर्ध्याला जात होती. मात्र, यादरम्यानच सेलसुरा येथे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. यानंतर नदीच्या पुलावरुन गाडी खाली कोसळली. या घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात आमदार विजयभाऊ रहांगडाले (Vijay Rahangdale's Son) तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांचे एकुलते एक सुपुत्र अविष्कार रहांगडाले (Avishkar Rahangdale Accident) यांचाही मृत्यू झाला आहे.
या घटनेत मरण पावलेले सर्व सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की नदीवरुन पुल तोडून गाडी खाली कोसळली. जवळपास 40 फूट पुलावरून हे वाहन खाली पडलं आहे. सर्व मृतक विद्यार्थी हे 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं.
पोलीस आणि प्रशासन सध्या पुढील तपास करत आहेत. नीरज चव्हाण, अविष्कार रहांगडाले, नितेश सिंह, विवेक नंदन, प्रत्युष सिंह, शुभम जैसवाल, पवन शक्ती, अशी अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.