बस-टँकर अपघातात 7 जण ठार

बस-टँकर अपघातात 7 जण ठार

पुणे- नगर हमरस्त्यावर लोणीकंद गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत 7 जण ठार आणि 9 जण जखमी झालेत.

  • Share this:

03 जुलै : पुणे- नगर हमरस्त्यावर लोणीकंद गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत 7 जण ठार आणि 9 जण जखमी झालेत. आयमॅक्स आणि लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये या जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेत मृत पावलेल्या सात पैकी सहा जण हे पुण्यातील नामांकित आयटी कंपनीचे कर्मचारी असल्याचं पोलिस तपासात उघड झालंय.

नुपूर साहू, निखिल जाधव, अक्षय दाभाडे, विशाल चव्हाण, वैभव माने, महेश पवार, आणि अनुश्री बागेवाडी अशी मृतांची नावं आहेत.या अपघातानंतर हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनत चालल्याचं सत्य पुन्हा एकदा समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 09:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading