लॉकडाऊनच्या एका महिन्यात तब्बल 70 हजार गुन्हे तर पोलिसांनी इतका वसूल केला दंड!

लॉकडाऊनच्या एका महिन्यात तब्बल 70 हजार गुन्हे तर पोलिसांनी इतका वसूल केला दंड!

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात 477 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल: राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 69374 गुन्हे दाखल झाले असून 14,955 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 63 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत राज्यभरात पोलिस विभागाच्या 100 नंबर वर 77,670 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा 602 जणांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात पाठण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1084 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर सुमारे 45168 वाहने जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.

हेही वाचा..राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार का? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 148 घटनांची नोंद झाली असून यात 477 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलिस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 15 पोलिस अधिकारी व 81 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या 12 पोलिस अधिकारी व 77 पोलिस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा.. चिंताजनक! दोन कोरोना योद्धांचा बळी, मुंबईत पोलिस तर मालेगावात डॉक्टराचा मृत्यू

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 25, 2020, 9:32 PM IST

ताज्या बातम्या