तरडगावातील आरोग्य केंद्रात 7 महिन्यात 69 गर्भपात!

तरडगावातील आरोग्य केंद्रात 7 महिन्यात 69 गर्भपात!

दोषीच्या विरोधात खुद्द कुटुंब कल्याणच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी अहवाल दिला आहे मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

  • Share this:

सातारा, 10 नोव्हेंबर: साताऱ्यातील तरडगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 महिन्यात 69 गर्भपात करण्यात आले आहेत. डॉ.अनिल कदम यांनी गर्भपात करताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने घालून दिलेले कोणतेच नियम पळाले नसल्याचं समोर आलं आहे.दोषीच्या विरोधात खुद्द कुटुंब कल्याणच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी अहवाल दिला आहे मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

तरडगाव च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ अनिल कदम यांनी कोणत्याही तपासण्या न करता खोटी कारणं देऊन हा गर्भपात केल्याचं डॉ.प्रवीण कदम यांनी माहितीच्या अधिकारात उघड केलं आहे. अगदी वरिष्ठांना कोणतीही पूर्व सूचना न देता डॉ . अनिल कदम यांनी तब्बल 105 एमटीपी किट मागवले. त्यातील 61 किट म्हणजेच गर्भपाताच्या औषधाचा वापर करण्यात आला . मात्र त्याची कोणतीही नोंद या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आली नाही .महत्त्वाचं म्हणजे एमटीपी किटचा वापर हा 6 महिन्यापेक्षा मोठं अर्भक काही अपरिहार्य कारणांनी पाडायचं असेल तरच त्याचा उपयोग केला जातो.

कुटुंब कल्याणच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी या बाबत नेमलेल्या 5 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात अनेक ठिकाणी डॉ. अनिल कदम दोषी असल्याचा निष्कर्ष दिला आहे.

एका छोट्याशा आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशासनाला अंधारात ठेवून निष्काळजीपणे गर्भपात केले जात होते आणि तसे पुरावे मिळून देखील डॉ.अनिल कदम आणि त्यांच्या सहकारी यांच्यावर कधी कारवाई होणार हाच प्रश्न विचारला जातो आहे.

First published: November 10, 2017, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading