Home /News /maharashtra /

धक्कादायक! बीडमध्ये 65 वर्षाच्या वृद्धाचा चाकूने भोसकून खून; मृतदेहाशेजारी आढळलेल्या चिठ्ठीने खळबळ

धक्कादायक! बीडमध्ये 65 वर्षाच्या वृद्धाचा चाकूने भोसकून खून; मृतदेहाशेजारी आढळलेल्या चिठ्ठीने खळबळ

बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षांच्या वृद्धाच्या भोसकून खून (Murder) करण्यात आला आहे. ही घटना शिरुर तालुक्यातील आनंदगावमध्ये (Anandgaon) शनिवारी सकाळी घडली.

  बीड, 8 मे : बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षांच्या वृद्धाचा भोसकून खून (Murder) करण्यात आला आहे. ही घटना शिरुर तालुक्यातील आनंदगावमध्ये (Anandgaon) शनिवारी सकाळी घडली. कुंडलिक सुखदेव विघ्ने असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ -  शेतात गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. तर मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी मिळून आली आहे. यात ‘माझ्या पत्नीचा खून झाला असून मारेकरी गजाआड होइपर्यंत खूनाचे सत्र सुरू राहील’ असा मजकूर लिहलेला आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या या चिठ्ठीने खळबळ उडाली आहे. कुंडलिक सुखदेव विघ्ने (65) असे खून झालेल्या वृ़द्धाचे नाव आहे. मृत कुंडलिक सुखदेव विघ्ने शेतातील उन्हाळी पिकांचे वन्यजीवांपासून रक्षण करण्यासाठी शुक्रवारी रात्रीच शेतात मुक्कामी गेले होते. मात्र, शनिवारी सकाळी उशिरापर्यत ते घरी न आले नाही. यामुळे त्यांच्या मुलाने शेतात जाऊन शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, सहायक निरीक्षक रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हेही वाचा - सुनेनं भांडण करू नये म्हणून सोपवलं तांत्रिकाच्या हातात! आयुष्यातले 79 दिवस घडला असा भयंकर प्रकार
  पोलीस अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती - 
  तसेच या खुनाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. तालुक्यात मागील काही दिवसांत कोणत्याही महिलेचा खून झालेला नाही. चिठ्ठीतून दिशाभूलही करत खुन्याचा प्रयत्न असू शकतो. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, अशी माहिती शिरुर कासारचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Beed news, Murder news

  पुढील बातम्या