Home /News /maharashtra /

हृदयद्रावक! राजगडावर चढाई करताना मृत्यूनं गाठलं; पुण्यातील पर्यटकाचा दुर्दैवी अंत

हृदयद्रावक! राजगडावर चढाई करताना मृत्यूनं गाठलं; पुण्यातील पर्यटकाचा दुर्दैवी अंत

Pune News: राजगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील एका ज्येष्ठाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजगडाची चढाई करत असतानाच त्यांना मृत्यूनं गाठलं आहे.

    पुणे, 29 नोव्हेंबर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pandemic) आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकजण आपल्या घरात अडकून पडले होते. पण अलीकडेच प्रशासनानं कोरोना नियम शिथिल केल्यामुळे अनेकजण विविध ठिकाणी पर्यटनाला जाण्यास पसंती देत आहेत. यातही गड, किल्ले आणि ट्रेकिंग (Trekking) करण्याकडे अनेक पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी गड-किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. अशात राजगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील (Pune) एका ज्येष्ठाचा दुर्दैवी मृत्यू (tourist died while climbing rajgad fort) झाला आहे. दिलीप बबनराव महामुनी असं मृत पावलेल्या 64 वर्षीय वयोवृद्धाचं नाव आहे. मृत महामुनी हे पाषण परिसरातील सुतारवाडी येथील रहिवासी होते. त्यांना गड किल्ल्यांवर ट्रेकिंग करायला आवडत होतं. त्यामुळे ते 28 नोव्हेंबर रोजी रविवारी राजगडावर ट्रॅकिंगसाठी गेले होते. दरम्यान फणशीमार्गे गडावर चढाई करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. हेही वाचा-Omicronचा धोका वाढला; परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम,जाणून घ्या नवी नियमावली यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकारी मित्रांनी आणि स्थानिकांनी त्यांना  तातडीनं वेल्हे येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी गेलं असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून महामुनी यांना मृत घोषित केलं आहे. या घटनेची माहिती वेल्हे पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे. हेही वाचा- राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं सावट; रब्बी पिकांना धोका, शेतकऱ्यांची चिंता वाढली ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजगडाची चढाई करत असताना, 64 वर्षीय ज्येष्ठाला मृत्यूनं गाठल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास वेल्हे पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Pune

    पुढील बातम्या