मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रात लम्पीचं थैमान, जनावरांचा मृत्यूचा आकडा वाढला, महाराष्ट्र सरकारपुढे मोठं आव्हानं

महाराष्ट्रात लम्पीचं थैमान, जनावरांचा मृत्यूचा आकडा वाढला, महाराष्ट्र सरकारपुढे मोठं आव्हानं

लम्पीचा धोका आता राज्यातही वाढताना दिसतोय. कारण महाराष्ट्रात लम्पीमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लम्पीचा धोका आता राज्यातही वाढताना दिसतोय. कारण महाराष्ट्रात लम्पीमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लम्पीचा धोका आता राज्यातही वाढताना दिसतोय. कारण महाराष्ट्रात लम्पीमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 14 सप्टेंबर : देशात लम्पी व्हायरसचं थैमान वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे लम्पीचा धोका आता राज्यातही वाढताना दिसतोय. कारण महाराष्ट्रात लम्पीमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लम्पी व्हायरसमुळे महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा वाढला आहे. राज्याच लम्पी व्हायरसमुळे 64 पशुधनाचा मृत्यू झाला. राज्यात लम्पी व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू जळगाव जिल्हयात झाले आहेत. जळगावात एकूण 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ अहमदनगरमध्ये आतापर्यंत 17 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

भारतात 9 सप्टेंबरपर्यंत 70 हजार 181 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थानमध्ये 45,063, पंजाबमध्ये 16,866, गुजरातमध्ये 5344 आणि हरियाणामध्ये 1,810 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार पशुधनाचा मृत्यू :

जळगाव : 24

अहमदनगर - 17

धुळे जिल्हा - 1

अकोला - 5

पुणे - 8

सातारा - 2

बुलढाणा - 3

अमरावती - 3

वाशिम - 1

लम्पी व्हायरसचा संसर्ग गायींसाठी धोकादायक आहे. गाईच्या दुधावरही त्याचा परिणाम दिसून येतोय. या संदर्भात लखनऊ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ अरविंद कुमार वर्मा यांनी सांगितलं की, ‘गाईच्या दुधात लम्पी व्हायरसचा प्रभाव दिसून येत असून दुधातही व्हायरसचे घटक आढळतात.’ मात्र, गाईच्या दुधात असलेले विषाणू दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळावं.

('वेदांता' महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन, मोदींकडून मोठं आश्वासन)

माणसांसाठी यामध्ये कोणतेही हानिकारक घटक शिल्लक नाहीत. परंतु हे दूध जर गाईच्या पाडसाने म्हणजेच वासराने प्यायलं तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अशा स्थितीत वासराला गाईपासून वेगळं करावं. लम्पी व्हायरसचा थेट परिणाम गाईच्या दूध उत्पादनावर आणि गर्भाशयावर होतो. तज्ज्ञांच्या मते, हा रोग दुधाच्या उत्पादनावर परिणाम करतो, जे 50 टक्क्यांनी कमी होतं. हा आजार आर्थिक नुकसानीचा आजार आहे. यामध्ये मृत्यूचं प्रमाण 1 ते 2 टक्के आहे.

माणसाला धोका नाही

लम्पी व्हायरसचा माणसाला कोणताही धोका नाही, तो प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये पसरतो. तज्ज्ञांच्या मते, या व्हायरसमुळे जनावरांना झालेल्या जखमांना कडुलिंब किंवा हळद आणि तुपाची पेस्ट लावल्यास जखमा भरतात आणि या आजाराने ग्रस्त गुरं 1 आठवडा ते 10 दिवसांत बरी होऊ शकतात. परंतु, यापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय लसीकरण आहे. लसीकरणामुळे व्हायरसचं संक्रमण लवकर थांबवता येतं. या व्हायरसचा संसर्ग रोखण्याबाबत तज्ज्ञांचं असं मत आहे की, ‘संक्रमित प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळं करणं हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.’

दुसरीकडे, लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, लम्पी व्हायरसने संक्रमित असलेल्या गायीच्या मूत्र आणि शेणात व्हायरसचे घटक आढळतात का? यावर तज्ज्ञांचं मत आहे की, व्हायरसचा त्यावर कोणताही प्रभाव दिसत नाही. तसंच, जे लोक गोमूत्र किंवा शेण वापरतात त्यांच्यावर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. त्यामुळे गोमूत्र आणि शेणाचा वापर करणं जोखमीचं नाही.

लम्पी व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. लम्पी व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

First published:

Tags: Maharashtra News, Politics